संदीप गावडे ‘बाहेरचे’ नव्हे तर ‘हक्काचे आणि कामाचे’ माणूस

तळवडे मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराचा धडाका

सावंतवाडी दि.०३: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. विरोधकांकडून ‘बाहेरचा उमेदवार’ असा अपप्रचार केला जात असतानाच, संदीप गावडे हे फणसवडे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र असल्याचे समोर आल्याने विरोधकांचे मुद्दे फोल ठरत आहेत.

राजकीय द्वेषातून अपप्रचाराचा प्रयत्न
संदीप गावडे यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे घाबरलेल्या विरोधकांनी त्यांना ‘बाहेरचा’ हे विशेषण लावून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गावडेंनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यांत कोणताही भेदभाव न करता केलेली विकासकामे त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देत आहेत. सुज्ञ मतदारांनी या संकुचित वृत्तीचा विचार करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

विकासाचा डोंगर: ३५ वर्षांचा प्रश्न अवघ्या दोन महिन्यांत मार्गी
संदीप गावडे यांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. यामध्ये काही प्रमुख कामांचा समावेश आहे:

प्रलंबित साकवाचा प्रश्न: तब्बल ३५ वर्षांपासून रखडलेला विलवडे-भालावल धनगरवाडी साकवाचा प्रश्न त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत सोडवून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.

रस्ते मजबुतीकरण: आंबोली-महादेवगड, दाणोली-देवसू-पारपोली, चौकुळ, माजगाव, असनिये व आंबोली घाट पर्यायी मार्गासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

पाणी आणि आरोग्य: ‘हर घर जल’ योजना, आरोग्य शिबिरे, मोफत औषधे आणि दिव्यांगांसाठी विशेष मदतीचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत.

डिजिटल कनेक्टिव्हिटी: ग्रामीण भागात 4G टॉवर उभारून कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मार्गी लावला.

सत्ताधारी पक्षाचे बळ आणि व्हिजन
केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने विकासकामांसाठी आवश्यक असणारा मोठा निधी खेचून आणण्याची क्षमता संदीप गावडे यांच्यात आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. “विकासासाठी केवळ भाषणे नव्हे, तर कृती हवी,” हा विचार घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

निवडणूक विकासाची की शब्दांच्या जादूची?
“हा लढा केवळ पदासाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि भविष्यासाठी आहे,” असे आवाहन गावडे समर्थक करत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता, कामाचा अनुभव असलेला आणि जमिनीशी जोडलेला कार्यकर्ता म्हणून संदीप गावडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन सुज्ञ मतदारांना करण्यात येत आहे.

तळवडे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाला ‘नंबर एक’ करण्यासाठी संदीप गावडे हेच योग्य नेतृत्व असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here