सिंधुदुर्ग दि.०५: आंगणेवाडी यात्रा २०२६ दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाडया चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
यात्रेकरू आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव जंक्शन दरम्यान साप्ताहिक विशेष गाडया धावणार आहेत.
ट्रेन क्र. 01004 मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक ही विशेष ट्रेन दि. 7 आणि 9 फेब्रुवारी रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 01003 लोकमान्य टिळक-मडगाव जं्शन ही विशेष ट्रेन दि. 8 आणि 10 फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7.55 वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री 12.00 वाजता मडगाव जं्शनला पोहोचेल. या विशेष गाडया करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाडयांची रचना एकूण 22 कोचांची असून त्यामध्ये 20 स्लीपर कोच आणि 2 एसएलआर कोच असणार आहेत. ट्रेन क्र. 01004 चे आरक्षण दि. 4 फेब्रुवारीपासून सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम, इंटरनेट व आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू झाली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*◾
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887


