25.1 C
New York
Saturday, June 13, 2026

Buy now

spot_img
Home Blog

🛑 ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये! सिंधुदुर्गात नव्या जबाबदाऱ्या जाहीर! 🛑

🔥 सावंतवाडी मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड! 🔥 कणकवलीची मोठी जबाबदारी युवासेनेच्या सुशांत नाईक यांच्या खांद्यावर!

📍 सावंतवाडी / कणकवली दि.१२:– आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. सावंतवाडी मतदारसंघात ‘धनशक्ती’विरोधात जोरदार लढा देणारे रुपेश राऊळ यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करत आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक मध्ये सक्षम उमेदवार रिंगणात उतरवत पक्षाने विरोधकांना कडवे आव्हान दिले होते सर्व निवडणुका चुरशीच्या करत कोणतीही जागा बिनविरोध होऊ दिली नव्हती रुपेश राऊत यांच्या याच सातत्यपूर्ण संघर्षाची दखल घेत पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा सावंतवाडीची जबाबदारी सोपवली आहे
तसेच, कणकवली मतदारसंघात थेट पालकमंत्री आणि खासदारांना वेळोवेळी आव्हान देणारे युवासेनेचे आक्रमक नेते सुशांत नाईक यांना मुख्य शिवसेनेत घेत त्यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी या निवडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com

🪀 *आमच्या Whatsapp  ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*  https://akhandhindustanlive.com

📹  *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

सावंतवाडीत ‘नॅब नेत्र रुग्णालयात’ अत्याधुनिक रेटिना (नेत्रपटल) विभागाचे १९ जून रोजी उद्घाटन!

सावंतवाडी दि.११: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्ररुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. सावंतवाडी येथील भटवाडी येथील प्रसिद्ध नॅब नेत्र रुग्णालयात (NAB Eye Hospital) अत्याधुनिक ‘रेटिना’ (नेत्रपटल) विभागाचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
​या नवीन विभागामुळे आता कोकणातील रुग्णांना पडद्याशी (रेटिना) संबंधित विविध गंभीर आजारांचे अचूक निदान आणि अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळणार आहेत. यामुळे रुग्णांची गोवा किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाण्याची ससेहोलपट थांबणार आहे.
​ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हस्ते होणार उद्घाटन
​या सुसज्ज विभागाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे (ओरोस) धडाडीचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
​रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सेवा:
​या नवीन रेटिना विभागांतर्गत रुग्णांना खालील अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध होणार आहेत:​फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया (Phaco Cataract Surgery)
​नेत्रपटल (रेटिना) तपासणी * रेटिना स्कॅनिंग व सोनोोग्राफी
​डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान व उपचार (मधुमेहामुळे डोळ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांचे उपचार)
​रेटिना लेझर उपचार
​अत्याधुनिक रेटिना शस्त्रक्रिया (Retina Surgeries)
​’नॅब’ व्यवस्थापनाचे आवाहन
​या सुवर्णसंधीचा आणि अत्याधुनिक उपचारांचा सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू नेत्ररुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष श्री. अनंत उचगावकर, सचिव श्री. सोमनाथ जिगजिनी, श्री. राहुल देशपांडे, श्री. मनीष पटवर्धन तसेच सर्व नॅब ट्रस्टीज व व्यवस्थापन मंडळाने केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कुडाळ नगरपंचायतीचा महत्त्वाचा निर्णय ‘ऑनलाईन’ मिळणार घरपत्रक उतारा मालमत्ता कर पूर्ण भरणे बंधनकारक

कुडाळ दि.११ : नगरपंचायत क्षेत्रात आता घरपत्रक उतारा (असेसमेंट उतारा) ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजिटल प्रक्रियेला नगरपंचायतीकडून अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. मात्र, हा ऑनलाईन उतारा मिळवण्यासाठी नागरिकांना चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर भरणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात कुडाळ नगरपंचायतीने एक जाहीर पत्र प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये नवीन प्रणालीची सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लागू केलेल्या नवीन केंद्रीय संगणकीय प्रणालीनुसार आता मालमत्तेचे असेसमेंट उतारे ऑनलाइन दिले जात आहेत. या नवीन नियमाप्रमाणे, संबंधित मालमत्तेचा चालू आर्थिक वर्षातील घरफाळा किंवा मालमत्ता कर पूर्णपणे भरलेला असेल, तरच सिस्टीममधून ऑनलाईन असेसमेंट उतारा उपलब्ध होणार आहे. नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे की, जर नागरिकांचा चालू वर्षाचा घरफाळा किंवा जुनी थकबाकी शिल्लक असेल, तर ऑनलाईन पोर्टलवरून असेसमेंट उतारा डाऊनलोड करता येणार नाही. कर पूर्ण भरल्याशिवाय ही संगणकीय प्रणाली उतारा जनरेट करत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांना, घरमालकांना किंवा व्यावसायिकांना आपल्या मालमत्तेचा असेसमेंट उतारा हवा असेल, त्यांनी सर्वात आधी आपला चालू वर्षाचा घरफाळा आणि थकबाकी जमा करावी. कर भरल्याची खात्री केल्यानंतरच ऑनलाईन उताऱ्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना नगरपंचायतीत चकरा मारण्याची गरज भासणार नाही आणि वेळही वाचेल. परंतु, या तांत्रिक प्रणालीच्या सुलभ वापरासाठी नागरिकांनी आपला कर वेळेत भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला करिअर मार्गदर्शन

सावंतवाडी दि.११: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रात सीईटी सेल मार्फत होणारी प्रवेश प्रक्रिया, कॅप राउंड्स, प्राधान्यक्रम भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय फार्मसी क्षेत्रातील करिअर संधी, उच्च शिक्षणाच्या दिशा आणि उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी ते भोसले नॉलेज सिटी दरम्यान मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून हे मार्गदर्शन सत्र पूर्णपणे विनामूल्य आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी ९८२३९१६००५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाजपला धक्का वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच,उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

 

विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

सिंधुदुर्गात पुन्हा शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात

सिंधुदुर्ग दि.११: वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार,शिवसेना नेते विनायक राऊत, माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी विनायक राऊत म्हणाले, अनेक संकटे झेलून शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही.भाजपच्या सत्ता काळात देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्हा एका कुटुंबाच्या हातात आपण दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असून ड्रग्स, गांजा,दारू यासारख्याअवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे.पालकमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे गोव्यातील कॅसिनो देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.

वैभव नाईक म्हणाले, नेर्ले गावावर सत्ताधाऱ्यांकडून जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. तुमचा निर्णय चुकला असे कधीही तुम्हाला वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आहे. परंतु कुठल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरु झालेल्या जलजीवन मिशन योजनेतील एकही काम आताच्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही हि वस्तुस्थिती आहे. आपल्या पंतप्रधानांची जागतिक पातळीवर काय प्रतिमा आहे हे देखील सर्वाना कळून चुकले आहे. देशात पेट्रोल डिझेल मिळत नसून सर्वच वस्तू महागल्या आहेत. अमेरिका सांगेल त्याच देशाकडून आपल्याला तेल खरेदी करावे लागते. उज्वला गॅस योजनेत १२ गॅस सिलेंडर गरीब महिलांना दिले जात होते ते प्रमाण आता ४ वर आले आहे.त्यामुळे गरीब महिलांवर सरकारकडून हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगत याविरोधात आपल्याला आंदोलन करावे लागणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

परशुराम उपरकर म्हणाले,शिवसेना हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. भाजपच्या सत्तेला नाकारून आपण सर्वजण शिवसेना पक्षात आलात.सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो तेव्हाच त्यांचे लोक विरोधी पक्षाकडे वळतात. कार्यकर्त्यांना वापरायचे आणि नंतर फेकून द्यायचे असा राणे कुटूंबाचा देखील इतिहास आहे. परंतु आपण आता शिवसैनिक झाला आहात. आपल्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू.पालकमंत्री नितेश राणे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत.सिंधुदुर्गातील अवैध धंदे त्यांना रोखता आले नाहीत. त्याची पुष्टी त्यांच्या भावानेच दिली आहे. नितेश राणेंनी यापूर्वी सुरु केलेल्या सर्वच योजना आणि प्रकल्प जसे बंद झाले तशीच त्यांनी सुरु केलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा देखील अवघ्या एका महिन्यात बंद पडल्याचे सांगितले.

सुशांत नाईक म्हणाले, या पक्षप्रवेशाने नितेश राणे आणि भाजप सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पहिली चिंगारी वैभववाडी येथे पडली असून आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती पसरणार आहे. शिवसेना एक विचाराने चालणारा पक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केले जातात. परंतु आपण सर्वानी शिवसेना पक्षावर विश्वास दाखवून पक्षात प्रवेश केलात. आपला प्रवेश कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर तत्वासाठी झाला आहे. मी आपल्या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो. आपल्या पाठीशी आम्ही कायम ठाम राहणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.

सौ.नीलम पालव म्हणाल्या,सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात झाली असून जुन्या नव्या सर्वांनी एकजुटीने पक्ष संघटना वाढीचे काम करावे.आता राज्यातील नागरिकांना भाजप- शिंदे सरकारवर विश्वास राहिलेला नाही. महागाईने जनता होरपळली आहे.गुन्हेगारी, भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र भरडला जात आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत सत्तापालट अटळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह ग्रा. प. सदस्या शोभना जाधव, सिद्धी सुर्वे,सुप्रिया जाधव,रुपेश पांचाळ, माजी उपसरपंच मोहन हडशी, ग्रामस्थ मयूर सुर्वे,मनोज सुर्वे,भरत खानविलकर,सागर सुर्वे,रवीउदय पांचाळ,जयेश पांचाळ,जयवंत पांचाळ,अनंत कांबळे,सुधाकर पांचाळ,परेश पांचाळ,नितीन पांचाळ,गणेश पांचाळ,रत्नकांत सुर्वे,विश्वजित खानविलकर,विश्वनाथ पांचाळ,चंद्रकांत खानविलकर,अनंत निंबाळकर,महेश पांचाळ,गौरव सुर्वे, गुरुनाथ हडशी, भावेश हडशी,गुणाजी सुर्वे,अक्षय पांचाळ,समीर पांचाळ,अक्षय कुळये यांसह शेकडो नेर्ले ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा झेंडा आणि मशाल हाती घेतली आहे.

याप्रसंगी वैभववाडी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संघटक गुलझार काझी, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शाखाप्रमुख यशवंत खानविलकर, सोशल मीडिया प्रमुख विठोबा गुरव, सुरेश पांचाळ, संजना गावडे, भरत खानविलकर, वसंत खानविलकर, मयूर सुर्वे, रमाकांत मोरे, बाळा राऊत, भाऊ वळंजू, प्रसाद नारकर, यशवंत गवाणकर, जितेंद्र तळेकर, सूर्यकांत परब, रोहित पावसकर, नाना जैतापकर, सुरेश पांचाळ, ओमकार इस्वलकर, रिहाना काझी, नलिनी पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सावंतवाडीत सत्कार सोहळा; माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी दि.१०: सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत मुला-मुलींचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता सावंतवाडी येथील खासकिलवाडा, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीशेजारी असलेल्या मांगिरीश बँक्वेट हॉल येथे संपन्न होणार आहे.
​या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार तथा माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेच्या युवराज्ञी तथा नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले, जि.प. सदस्य विक्रांत सावंत आणि जेष्ठ नेते संदीप कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
​सकल मराठा समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष सीताराम गावडे व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, समाजबांधवांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🌴 सिंधुदुर्ग जिल्ह्याची ‘मेडिकल टूरिझम हब’कडे वाटचाल! आचरा, आंबोली आणि रेडी येथे अत्याधुनिक ‘आयुष’ केंद्रे प्रस्तावित!

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी ‘आयुष’ केंद्रांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करताना आमदार दीपक केसरकर व इतर मान्यवर.

🎯 आमदार दीपक केसरकर यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निधीची मागणी; पर्यटनाला मिळणार नवी गती!

सावंतवाडी दि.१०: सिंधुदुर्ग जिल्ह्याची देशातील सर्वाधिक स्वच्छ आणि निसर्गरम्य पर्यटन जिल्हा म्हणून असलेली ओळख आता अधिक गडद होणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर अत्याधुनिक ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ आणि ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पत्राद्वारे या कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

📍 कुठल्या पर्यटन स्थळांवर काय होणार?
१) आचरा आणि आंबोली: ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ 🌊🌧️
परदेशी आणि स्थानिक पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेता, समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले आचरा आणि जगप्रसिद्ध वर्षा पर्यटनस्थळ आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (PHC) हे क्लिनिक सुरू केले जाणार आहे.

💰 अपेक्षित खर्च: प्रति केंद्र २३.३० लक्ष रुपये (दोन्ही केंद्रांसाठी एकूण ४६.६० लक्ष रुपये).
२) रेडी (वेंगुर्ला): भव्य ‘विशेष आयुष केंद्र’ व पंचकर्म सुविधा 🛕🧘🏻‍♂️
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या रेडी येथे १० गुंठे जागेवर हे भव्य केंद्र उभारले जाईल. येथे भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी आयुर्वेद, पंचकर्म आणि योग यांसारख्या पारंपरिक उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्या जातील.

💰 अपेक्षित खर्च: इमारत, फर्निचर व उपकरणांसह एकूण ८०.२० लक्ष रुपये.
🤝 लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा समन्वय
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती श्री. प्रितेश शंकर राऊळ यांनी या संदर्भात आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन दिले होते. जनहित आणि पर्यटनाचा विकास लक्षात घेऊन आमदार केसरकर यांनी हा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मुंबई कार्यालयाकडे पाठवला असून, आरोग्यमंत्र्यांनी याला तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती केली आहे.

“या प्रकल्पांमुळे केवळ सिंधुदुर्गातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणार नाही, तर जागतिक स्तरावर जिल्ह्याची ‘वैद्यकीय पर्यटन केंद्र’ (Medical Tourism Hub) म्हणून एक नवीन आणि प्रगत ओळख निर्माण होईल.”

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

🚨 सावंतवाडीत काँग्रेसचा महासंताप! गॅस-इंधन दरवाढ आणि स्थानिक प्रश्नांवरून प्रांत कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा!

 

नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, साईनाथ चव्हाण व इतर पदाधिकारी

🔥 आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी; बॅनर झळकले!

सावंतवाडी दि.१०: देशभरात गगनाला भिडलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंतवाडीत तीव्र आंदोलन छेडण्यात आले. गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, गॅससाठी करावी लागणारी महिन्याभराची प्रतीक्षा आणि स्थानिक प्रश्नांवरून काँग्रेसने सावंतवाडीचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निष्क्रियतेचा निषेध करत त्यांना जोरदार लक्ष्य केले.

चिटणीस नाका येथून निघालेला हा भव्य मोर्चा थेट प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडर आणि महागाईविरोधी फलक हातात घेऊन परिसर दणाणून सोडला. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

📌 आंदोलनातील प्रमुख मुद्दे आणि मागण्या:
गृहिणींचे बजेट कोलमडले: गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असून, सध्या गॅस मिळण्यासाठी तब्बल महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल द्या: पावसाळा सुरू असल्याने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात शेतीकामांना वेग आला आहे. मात्र, पेट्रोल पंपांवर कॅनमधून इंधन देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने तात्काळ कॅनमधून इंधन देण्याच्या सूचना पंपांना द्याव्यात.

अवैध उत्खनन आणि गांजा शेतीचा खळबळजनक आरोप: सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात सुरू असलेले अवैध माती उत्खनन आणि तिलारी धरण परिसरात होणारी बेकायदेशीर गांजा शेती यावर प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी.

⚠️ …अन्यथा प्रत्येक तालुक्यात आंदोलन छेडणार!
“प्रशासनाने जनतेच्या या तीव्र भावनांची गांभीर्याने दखल घ्यावी. वरिष्ठ पातळीवर सकारात्मक पत्रव्यवहार करून जनतेला न्याय न दिल्यास, आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!”
— अरविंद मोंडकर (जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस)

👥 दिग्गज नेत्यांची मोठी उपस्थिती:
या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, समीर वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबूंलकर, नगरसेवक तौकीर शेख, माजी नगरसेवक राजेंद्र मसुरकर, तसेच अभय मालवणकर (सावंतवाडी), बाबू गवस (दोडामार्ग), भालचंद्र जाधव (वैभववाडी), जेम्स फर्नांडिस (मालवण) यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज* 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp  ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*  https://akhandhindustanlive.com 📹  *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

 

सावंतवाडीत भरवस्तीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी हिसकावली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

सावंतवाडी दि.१०: शहरातील गजबजलेल्या कॉसमॉस बिल्डिंग परिसरात आज सकाळी भरवस्तीत एका महिलेची सोन्याची साखळी (चैन) लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी रंजना ठाकूर या सकाळी आपल्या घरासमोरील बागेत फुले काढत होत्या. दरम्यान, मोटरसायकलवरून दोन अज्ञात चोरटे तिथे आले. त्यांनी ठाकूर यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि काही समजण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून वेगाने पोबारा केला.

चोरटे सीसीटीव्हीत कैद; परप्रांतीय असण्याची शक्यता
हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी केलेल्या पेहरावावरून ते परप्रांतीय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका नीलम नाईक यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली आणि रीतसर पंचनामा केला. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अज्ञात चोरट्यांचा माग काढत असून त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरातील वाढत्या चोऱ्या लक्षात घेता पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563