सावंतवाडी दि.२८: शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत भरलेल्या रकमेत २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सांगली येथील बनावट नोटांच्या कारखान्याशी असलेले कनेक्शन उघड केले आहे. याप्रकरणी सांगली कारागृहात असलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिकृतपणे अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बँकेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात पैसे जमा केले होते. यावेळी कॅशियरच्या तपासणीत २०० रुपयांच्या आठ नोटा (एकूण १६०० रुपये) बनावट असल्याचे निदर्शनास आले. या नोटांबाबत ग्राहकाकडे चौकशी केली असता, चलनातून या नोटा आपल्याकडे आल्याचे त्याने सांगितले. बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
सांगली कनेक्शन आणि आरोपींची अटक
सावंतवाडीत जप्त केलेल्या बनावट नोटांचे सिरीयल नंबर आणि सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील नोटांचे सिरीज नंबर एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सांगली पोलिसांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्या गुन्ह्यातील सहा आरोपी सध्या सांगली कारागृहात होते.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने न्यायालयातून परवानगी मिळवून या सहा संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुढील संशयितांचा समावेश आहे:
सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, कोल्हापूर)
राहुल राजाराम जाधव (वय ३३, कोल्हापूर)
इब्रार आदम इनामदार (वय ४४, कोल्हापूर)
नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, कोल्हापूर)
संदीप बाळू कांबळे (वय ३८, कोल्हापूर)
सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, मालाड, मुंबई) अशी नावे आहेत.
कोकण आणि गोवा पोलिसांच्या रडारवर
बनावट नोटांची व्याप्ती आता कोकण आणि गोवा राज्यापर्यंत पसरली असण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. “सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात या रॅकेटचे धागेदोरे आहेत. कोकणातही या नोटा वितरित झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज असून, नागरिकांनी अशा नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या अटकेमुळे बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सिंधुदुर्गनगरी दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने शिस्तीबाबत अत्यंत कठोर पाऊल उचलले असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाणे त्यांना महागात पडले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ही धडक कारवाई केली आहे.
मालवण दि.२७: केंद्र सरकारने २०२३ मध्ये मंजूर केलेले ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक केवळ कागदावरच न ठेवता, त्याची अंमलबजावणी ‘आज आणि आत्ता’ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात राबवल्या जाणाऱ्या ‘पोस्टकार्ड अभियानाचा’ शुभारंभ आज मालवण येथून करण्यात आला.
🚨 BREAKING NEWS: आंबोली घाटात आयशर टेम्पो पलटी! 🚨

सावंतवाडी,दि.२६: संदीप गावडे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, यामध्ये माडखोल धवडकी शाळा नं. २ ची विद्यार्थिनी संस्कृती चोपडे हिने २०० पैकी १८२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, परीक्षा समितीचे अध्यक्ष सुधीर गावडे, सचिव दत्ताराम सावंत आणि समीर जाधव यांच्या उपस्थितीत हा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. २ ची विद्यार्थिनी आराध्या झोरे १८० गुणांसह द्वितीय आली आहे. तृतीय क्रमांकावर सावंतवाडी शाळा नं. २ चा राहील शेख, चौथ्या क्रमांकावर तळवणे शाळा नं. ४ चा गौरांग वैज आणि पाचव्या क्रमांकावर तळवणे शाळा नं. ४ ची श्रावणी कवडे यांनी झेप घेतली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १७२ गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी एकूण ३२८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा एकूण निकाल ७४.०८ टक्के लागला आहे.या यशाबद्दल गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेतील पहिल्या पाच यशस्वी विद्यार्थ्यांना सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे, तर त्यानंतरच्या ७५ विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.सन २०२५ आणि २०२६ चा संयुक्त बक्षीस वितरण सोहळा ३० एप्रिलला दुपारी २.०० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपालिका हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वंदना सावंत, तेजस्विता वेंगुर्लेकर, उद्देश नाईक यांच्यासह संदीप गावडे फाउंडेशनच्या संपूर्ण कार्यकारिणीने आणि अभ्यासक्रम मंडळाने विशेष मेहनत घेतली आहे.
कणकवली दि.२६:तालुक्यातील ओटव येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय आजीचे तोंड दाबून, त्यांना बेडरूममध्ये डांबून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या नातवाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (LCB) यश आले आहे. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२३, रा. विरार) आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी मीरा-भाईंदर परिसरातून ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सावंतवाडी दि.२६: विधानसभा मतदारसंघात सध्या शैक्षणिक प्रगती आणि प्रशासकीय गतिमानता या दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. एकीकडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले, तर दुसरीकडे निरवडे येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून शेकडो नागरिकांचे शासकीय प्रश्न मार्गी लावले गेले.