17.3 C
New York
Thursday, September 24, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 96

सावंतवाडीची चिमुरडी नृत्या जांभोरे हिने मृत्यूवर मात करून अखेर ही जिंकली लढाई

सावंतवाडी दि.१४: सावंतवाडीची चिमुरडी नृत्या जांभोरे हिने मृत्यूवर मात करून अखेर ही लढाई जिंकली आहे. ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण कोकणी माणसाच्या एकजुटीची आणि माणुसकीची यशोगाथा आहे. ‘नृत्या’
गेले अनेक महिने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.नृत्या आता पूर्णपणे ठिक असून धोक्याबाहेर आहे.
तिची प्रकृती सुधारल्यामुळे ती आता सुखरूप घरी परतत आहे.
नृत्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च अफाट होता, जो जांभोरे कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. अशा वेळी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.
आभाळमाया ग्रुप (मालवण कट्टा), सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आणि अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली.
संपूर्ण कोकण आणि विविध सामाजिक संघटना नृत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
नृत्याचे वडील महेश जांभोरे यांनी सर्व दात्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या:
मदत थांबवण्याचे आवाहन: नृत्या आता बरी झाली असल्याने आणि आवश्यक निधी जमा झाला असल्याने, यापुढे कोणीही आर्थिक मदत पाठवू नये. कठीण काळात ज्यांनी प्रार्थना केली आणि आर्थिक बळ दिले, त्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले आहेत.https://youtube.com/shorts/arsfyte_72A?si=CPGQ449QDLOVs0ng

“माणुसकीचा झरा अजूनही जिवंत आहे” हेच या घटनेने सिद्ध केले. सावंतवाडीच्या या चिमुरडीला नवजीवन मिळवून देण्यात सोशल मीडिया आणि कोकणी जनतेची एकजूट यशस्वी ठरली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत ‘व्हॅलेंटाईन डे’ ला अभिनेता अभिनय बेर्डेची उपस्थिती

सावंतवाडी येथे नवनिर्वाचित पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांचा सन्मान करताना माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर सोबत नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी आमदार राजन तेली अॅड दिलीप नार्वेकर आणि पदाधिकारी

अभिनेता अभिनय बेर्डेच्या उपस्थितीत हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेचा शानदार शुभारंभ

सावंतवाडी दि.१४: प्रेमदिनाचे औचित्य साधून सावंतवाडीत आज एक आगळावेगळा सोहळा पार पडला. प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे याच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी’ या संघटनेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कणकवली नगरपरिषद नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी आमदार राजन तेली अॅड दिलीप नार्वेकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी येथे आयोजित या सोहळ्याला अभिनय बेर्डे याने खास उपस्थिती लावली. यावेळी त्याने स्थानिक चाहत्यांशी संवाद साधला आणि संघटनेच्या नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

या संघटनेच्या माध्यमातून समाजातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय करणे हा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सांस्कृतिक वारसा: कोकणचा निसर्ग आणि खाद्यसंस्कृती याबद्दल अभिनय बेर्डे याने कौतुक केले. सावंतवाडीतील प्रेमामुळे भारावून गेल्याचे त्याने आपल्या संभाषणात नमूद केले.
केवळ संघटना बांधणीच नव्हे, तर समाजातील युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संघटना महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, हिंदू वैश्यवाणी समाजाचे मान्यवर आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. अभिनय बेर्डेला पाहण्यासाठी आणि त्याचे विचार ऐकण्यासाठी सावंतवाडीकरांनी मोठी गर्दी केली होती.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडे-बाईतवाडी मार्गावर मोठी दुर्घटना टळली

रस्त्यावर पडलेली झाडाची भलीमोठी फांदी

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शाळकरी मुलांचा जीव टांगणीला

सावंतवाडी दि.१४:  निरवडे-बाईतवाडी मार्गावर वनविभागाच्या जुनाट निर्गुडी (निलगिरी) जातीच्या झाडाची भलीमोठी फांदी विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात विद्युत वाहिन्या तुटण्याबरोबरच शेजारील आंब्याच्या झाडाचेही नुकसान झाले. सुदैवाने, याच वेळी शाळेतून घरी परतणारी मुले थोडक्यात बचावली असून मोठी जीवितहानी टळली आहे.
आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. निरवडे-बाईतवाडी मार्गावर वनविभागाच्या मालकीची अनेक जुनाट आणि धोकादायक झाडे आहेत. त्यातील एका मोठ्या झाडाची फांदी अचानक वीज वाहिन्यांवर पडली. फांदीचा भार सहन न झाल्याने विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या. याच मार्गावरून शाळकरी मुले जात होती, मात्र नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.
वनविभागाचा हलगर्जीपणा चर्चेत
या मार्गावर सध्या सुमारे १२ निर्गुडीची झाडे अत्यंत धोकादायक आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. ही झाडे तत्काळ तोडण्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी विनंत्या केल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पालकांचा आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे भाईवाडी, मल्हारवाडी आणि बाईतवाडी भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याची वेळीच दखल न घेतल्यास संतप्त पालक वनविभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील.
शाळकरी मुलांना सोबत घेऊन सावंतवाडी वनविभाग कार्यालयावर थेट आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
“अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का? आमच्या मुलांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि ती धोकादायक झाडे तात्काळ हटवा,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पुन्हा कोकणात येण्याची तयारी करतोय

सावंतवाडी येथे बोलताना अभिनेता अभिनय बेर्डे.

अभिनेता अभिनय बेर्डेचा शब्द

सावंतवाडी दि.१४: “कोकणाशी आमचे रक्ताचे नाते आहे. माझे वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनात कोकणाबद्दल अढळ स्थान होते आणि माझ्यासाठीही कोकण तितकेच खास आहे. लवकरच एका नव्या प्रकल्पासाठी पुन्हा कोकणात येण्याची तयारी मी करत आहे,” असे मनोगत अभिनेता अभिनय बेर्डे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटने’च्या कार्यक्रमासाठी ते प्रथमच शहरात आले होते.
‘उत्तर’ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती अभिनय बेर्डे यांचा मुख्य भूमिका असलेला ‘उत्तर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनय म्हणाला की, “हा सिनेमा माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. एका सोलो हिरो म्हणून मोठ्या ब्रेकनंतर मी येत होतो, त्यामुळे थोडी धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता हा चित्रपट ‘झी ५’ (Zee5) वर उपलब्ध असून लवकरच ‘झी मराठी’वरही प्रसारित होईल.” या चित्रपटासाठी अभिनयला ‘झी गौरव’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकनही मिळाले आहे.
निर्मात्यांच्या संघटनेची गरज मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवताना येणाऱ्या अडचणींवर अभिनयने भाष्य केले. “एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे स्क्रीनचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व निर्मात्यांनी एकत्र येऊन एक भक्कम संघटना बांधणे गरजेचे आहे. यामुळे प्रदर्शनाचे नियोजन नीट होईल आणि नवीन गुंतवणूकदारांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल,” असे त्याने सुचवले.
वडिलांच्या पावलावर पाऊल, पण स्वतःची वेगळी ओळख वडिलांच्या (लक्ष्मीकांत बेर्डे) आठवणींना उजाळा देताना अभिनय म्हणाला की, “त्यांची ओळख विनोदी अभिनेता म्हणून होती, पण मला स्वतःला एकाच ठराविक भूमिकेत अडकवून घ्यायचे नाही. मला थ्रिलर, सामाजिक आणि विनोदी अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. लोकांचे मनोरंजन करणे हाच माझा मुख्य उद्देश आहे.”
सोशल मीडिया आणि कलाकार सध्याच्या रील्स (Reels) बनवणाऱ्या तरुण कलाकारांना सल्ला देताना तो म्हणाला की, “कंटेंट क्रिएशन ही काळाची गरज असली तरी, कोकणाला नाटकाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे नवीन कलाकारांनी नाटकाचे शिक्षण आणि सराव याकडे दुर्लक्ष करू नये.”
व्हॅलेंटाईन डे असूनही कामात व्यस्त असलेल्या अभिनयने, “कामात व्यस्त राहण्यातच मला खरा आनंद मिळतो,” असे सांगत आपला कोकण दौरा उत्साहात पूर्ण केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सरमळे सपतनाथ मंदिरात आजपासून विविध कार्यक्रम

महाशिवरात्री साठी सरमळे येथील श्री देव सपतनाथ सजलेले मंदिर

सरमळे सपतनाथ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन व महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य

सावंतवाडी दि.१४: दोन वर्षांपूर्वी एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सरमळे येथील सपतनाथ मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच महाशिवरात्रनिमित्त आज शनिवारी १४ फेब्रुवारी पासून ते १५ फेब्रुवारी पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा – दाणोली या जिल्हा मार्गावरील नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव सपतनाथच्या या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.यानिमित्त शनिवारी सकाळी ९ वाजता ग्रामदैवत सातेरी भगवती मंदिरातील देवदवतांचे पालखी, तरंग काठीसह सवाद्य मिरवणुकीने सपतनाथ मंदिरामध्ये आगमन, सकाळी १० वाजता गणपती पूजन पुण्याहवाचन, आचार्य वरण, सपतनाथ व परिवार देवतावर अभिषेक व पूजा, सकाळी ११ वाजता वरद शंकर पूजा, अग्नी पूजन, होम हवन, पूर्णाहुती, दुपारी १ वाजता वाजता देवतांची महाआरती त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी ६:३० वाजता बाल गोपाळ मंडळाचे (शेरवाळेवाडी ओटवणे) यांचे भजन, सायंकाळी ७:३० वाजता गोवा येथील घुमट आरती, रात्री ८:३० वाजता सातेरी प्रासादिक मंडळाचे (सातूळी) भजन, रात्री ९:३० वाजता श्री देव रवळनाथ नवतरुण प्रासादिक मंडळ, (ओटवणे) यांचे भजन, रात्री १०:३० वाजतता बावळाट ग्रामस्थ मंडळाचे भजन, रात्री ११:३० वाजता सुधीर दळवी प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (कवठी) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.रविवारी दुपारी १२ वाजता सवाद्य पालखी तरंगकाठीसह देवतांचे नजीकच्या तेरेखोल नदी पात्रात तीर्थस्नान, दुपारी १ वाजता उपस्थित सर्व भाविकांना तरंगकाठीसह देवतांचा आशीर्वाद कौल संध्याकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी सातेरी भगवती देवस्थानचे मानकरी, देवस्थान कमिटी आणि सरमळे ग्रामस्थांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पिंगुळीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

 पिंगुळीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

कुडाळ दि.१४: पिंगुळी (ता. कुडाळ) येथे रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

आज शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पिंगुळी रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका गाडीची धडक संबंधित व्यक्तीला बसली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला आहे.

मृतदेहाची स्थिती: अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.

सध्याची स्थिती: मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कुडाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पुढील पाऊल: पोलिसांनी परिसरातील गावांशी संपर्क साधला असून कोणी बेपत्ता असल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

“पिंगुळी रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. आम्ही सर्व शक्यतांचा तपास करत आहोत.” – कुडाळ पोलीस विभाग

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

ओटवणे तिठा येथे मालवाहू ट्रकचा अपघात

असा होता अपघातग्रस्त ट्रक

सुदैवाने जीवितहानी टळली

सावंतवाडी ता.१४ : ओटवणे तिठा येथे आज पहाटे मालवाहू ट्रकचा अपघात झाला. कोल्हापूर येथून लोखंड भरून ट्रक गोवा दिशेने जात होता. विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय जवळील चढावर ट्रक चढत असताना पुढील भाग अचानक वर उचलला गेला आणि ट्रकमधील लोखंड रस्त्यावर खाली पडल्याने अपघात घडला.
सुदैवाने ट्रकच्या मागे कोणतेही वाहन किंवा व्यक्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सरमळे सपतनाथ मंदिरात आजपासून विविध कार्यक्रम

शिवरात्रौत्सवासाठी सजलेले सरमळे सपतनाथ मंदिर

सरमळे मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन व महाशिवरात्र उत्सवाचे औचित्य

https://youtube.com/shorts/arsfyte_72A?si=D0qwfqJ5sPMpVmgc

सावंतवाडी दि.१४: दोन वर्षांपूर्वी एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सरमळे येथील सपतनाथ मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच महाशिवरात्रनिमित्त आज शनिवारी १४ फेब्रुवारी पासून ते १५ फेब्रुवारी पर्यत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा – दाणोली या जिल्हा मार्गावरील नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव सपतनाथच्या या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.यानिमित्त शनिवारी सकाळी ९ वाजता ग्रामदैवत सातेरी भगवती मंदिरातील देवदवतांचे पालखी, तरंग काठीसह सवाद्य मिरवणुकीने सपथनाथ मंदिरामध्ये आगमन, सकाळी १० वाजता गणपती पूजन पुण्याहवाचन, आचार्य वरण, सपतनाथ व परिवार देवतावर अभिषेक व पूजा, सकाळी ११ वाजता वरद शंकर पूजा, अग्नी पूजन, होम हवन, पूर्णाहुती, दुपारी १ वाजता वाजता देवतांची महाआरती त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी ६:३० वाजता बाल गोपाळ मंडळाचे (शेरवाळेवाडी ओटवणे) यांचे भजन, सायंकाळी ७:३० वाजता गोवा येथील घुमट आरती, रात्री ८:३० वाजता सातेरी प्रासादिक मंडळाचे (सातूळी) भजन, रात्री ९:३० वाजता श्री देव रवळनाथ नवतरुण प्रासादिक मंडळ, (ओटवणे) यांचे भजन, रात्री १०:३० वाजतता बावळाट ग्रामस्थ मंडळाचे भजन, रात्री ११:३० वाजता सुधीर दळवी प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (कवठी) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.रविवारी दुपारी १२ वाजता सवाद्य पालखी तरंगकाठीसह देवतांचे नजीकच्या तेरेखोल नदी पात्रात तीर्थस्नान, दुपारी १ वाजता उपस्थित सर्व भाविकांना तरंगकाठीसह देवतांचा आशीर्वाद कौल संध्याकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी सातेरी भगवती देवस्थानचे मानकरी, देवस्थान कमिटी आणि सरमळे ग्रामस्थांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

सावंतवाडी नगरपरिषदेत ‘गाळे’ घोटाळा? मुंज बंधूंवर गंभीर आरोप

श्रेयस साईनाथ मुंज

३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे वाटपात मोठा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. नियमबाह्य गाळे वाटप आणि इमारतीमधील अनधिकृत तोडफोडीविरोधात प्रशासनाने १५ दिवसांत कारवाई न केल्यास, येत्या ३ मार्च २०२६ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा स्थानिक रहिवासी श्री. श्रेयस साईनाथ मुंज यांनी दिला आहे.

श्रेयस मुंज यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनानुसार, इंदिरा गांधी व्यापारी संकुलात प्रसाद रमाकांत मुंज, विनोद मुंज आणि प्रमोद मुंज या एकाच कुटुंबातील व्यक्तींनी अनेक गाळे लाटले आहेत. नगरपरिषदेच्या नियमानुसार एका कुटुंबाला दोनपेक्षा अधिक गाळे देता येत नाहीत, तरीही याठिकाणी १० हून अधिक गाळे एकाच व्यक्तीच्या ताब्यात असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

तक्रारीतील मुख्य मुद्दे आणि आरोप:
इमारतीला धोका: व्यावसायिक फायद्यासाठी ९ गाळ्यांमधील मधल्या भिंती, बीम आणि पिलरची अनधिकृतपणे तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चर कमकुवत होऊन इतर गाळेधारक आणि ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
भ्रष्टाचाराचा संशय: तत्कालीन सत्ताधारी बॉडीला १५ लाख रुपये दिल्याचे आणि अधिकाऱ्यांना मासिक हप्ते पोहोचवले जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. या ‘आर्थिक संगनमतामुळे’ प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याचा त्यांचा दावा आहे.
दुहेरी फायदा: ‘संत गाडगे महाराज मंडई’ मधील जुन्या गाळ्यांचा ताबा अद्याप सोडलेला नसताना, पुनर्विकासाच्या नावाखाली नवीन इमारतीतही गाळे वापरले जात आहेत. काही गाळ्यांचा वापर केवळ गोदामासाठी (गोडाऊन) केला जात असून ते बंद अवस्थेत आहेत.
तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या:
१. एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे असलेले अतिरिक्त गाळे त्वरित जप्त करून सील करावेत. २. इमारतीच्या तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीची वसुली संबंधितांकडून करण्यात यावी. ३. भविष्यात या कुटुंबाला कोणत्याही नवीन इमारतीत गाळे देऊ नयेत. ४. गरजू आणि नवीन व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत.
प्रशासनाची भूमिका: या गंभीर आरोपांमुळे सावंतवाडी शहरात एकच खळबळ उडाली आहे. आता १५ दिवसांच्या या ‘अल्टिमेटम’नंतर नगरपरिषद प्रशासन संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारणार की उपोषणाची वेळ येणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

“वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जर काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नगरपरिषद घेणार का? १५ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर मी ३ मार्चपासून उपोषणाला बसण्यावर ठाम आहे.” — श्रेयस साईनाथ मुंज (तक्रारदार)
🛑/——–/——-/—–/🛑——🛑—/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

झरेबांबर काजुळवाडी काजू बागायतीला आग

काजू बागेला लागलेली आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना ग्रामस्थ.

दोडामार्ग न.पं.चा अग्निशमन बंब तातडीने पोहोचला ; पुढील अनर्थ टळला

दोडामार्ग दि.१३: झरेबांबर काजुळवाडी येथे शुक्रवारी दुपारी काजू बागायतीला आग लागून २०० हुन अधिक काजू कलमे जळून खाक झाली. पिकुळे शेळपीवाडी येथील प्रदीप नाईक असं त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना कसई दोडामार्ग नगरपंचायतला समजताच अग्निशमन बंमने सदरील आग आटोक्यात आणली.

याबाबत घटना अशी की, शुक्रवारी दुपारी झरेबांबर काजूळवाडी येथे एका काजूच्या बागेतून आगीचे धूर येत असल्याचे काही लगतच्या ग्रामस्थांना निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य सहकाऱ्यांना या आगीची कल्पना दिली. लागलीच कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा अग्निशमन बंब पाचारण करून येथील आग आटोक्यात आणली. यावेळीच ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी विद्यमान जि प सदस्य दीपक गवस, आनंद तळणकर, पिकी कवठणकर, नयन भणगे, पेडणेकर, तसेच नगरपंचायतचे कर्मचारी सावंत, ताटे, पप्पू, सचिन, यांनी मदत कार्य केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563