17.3 C
New York
Thursday, September 24, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 95

सावंतवाडीची कन्या स्तुती गुरव यांचा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विशेष गौरव

नाशिकमधील ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन’ पुरस्काराची घेतली दखल; ‘कोकण मॅजिकल स्वीट इमली’ची राज्यस्तरावर चर्चा

सावंतवाडी दि.१५:आपल्या कल्पकतेने आणि जिद्दीने उद्योग क्षेत्रात अल्पावधीत मोठी भरारी घेणाऱ्या सावंतवाडी येथील ‘गुरव प्रॉडक्ट्स’च्या संस्थापिका स्तुती साईश्वर गुरव यांचा माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार व गौरव करण्यात आला. स्तुती गुरव यांनी मिळवलेल्या राज्यस्तरीय यशाची दखल घेत केसरकर यांनी त्यांचे कौतुक केले.

जिद्द आणि मेहनतीचे फळ
स्तुती गुरव यांनी एमएसएमई (MSME) परवान्याच्या माध्यमातून आपला व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे उभा केला आहे. त्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘कोकण मॅजिकल स्वीट इमली’ या नैसर्गिक उत्पादनाने बाजारपेठेत अल्पावधीतच ग्राहकांची पसंती मिळवली आहे. कोकणातील अस्सल चव आणि नैसर्गिक घटकांचा वापर यामुळे या उत्पादनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात स्तुती गुरव यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले होते. एका छोट्या शहरातून येऊन राज्य स्तरावर उद्योग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

केसरकर यांनी थोपटली पाठ
या राज्यस्तरीय यशाची माहिती मिळताच आमदार दीपक केसरकर यांनी स्तुती गुरव यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. “कोकणातील तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे आणि स्तुती गुरव यांच्यासारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

महाशिवरात्रीनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांचे श्री देव नागनाथ मंदिर येथे दर्शन

पांडवकालीन श्री देव नागनाथ मंदिरात दर्शन घेतांना भाजप युवा नेते विशाल परब सोबत पदाधिकारी

दोडामार्ग दि.१५ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तेरवण‑मेढे येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशाल परब यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नागनाथाच्या चरणी लीन होत जनसेवा व परिसराच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत देवस्थान समितीच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमावेळी चेतन चव्हाण, दीपक गवस, रंगनाथ गवस, संजय सातार्डेकर, सोनिया नाईक, पराशर सावंत, राजेश फुलारी, आनंद तळणकर, चेतन आजगावकर, शिरीष नाईक, समीर लोंढे, प्रेमानंद देसाई, वैभव सुतार तसेच देवस्थान समितीचे देवू गवस, जयराज गवस, प्रदीप गवस व सुनिल गवस आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

श्री देव रवळनाथ आरती

श्री देव रवळनाथ सातार्डा

श्री देव रवळनाथ आरती
जय देव जय देव जय रवळनाथा,कोकणचा अधिपती,तू देव माझा ॥धृ॥ चतुर्भुज मूर्ती उभी खड्गधारी,त्रिशूल डमरू अमृतपात्र करी ॥१॥ जय देव जय देव जय रवळनाथा,कोकणचा अधिपती,तू देव माझा ॥धृ॥ महालक्ष्मी हस्ते राजतिलक झाला, कुलदेव ग्रामदेव सर्वा मिळाला ॥२॥ जय देव जय देव जय रवळनाथा,कोकणचा अधिपती,तू देव माझा ॥धृ॥ दक्षिण मुखी उभा तू मुकुट धारी, दुष्टांना संहारी, भक्तां कैवारी ॥३॥ जय देव जय देव जय रवळनाथा,कोकणचा अधिपती,तू देव माझा ॥धृ॥

आरती मध्ये योग्यरीत्या चाल बसण्यासाठी बदल केले आहेत. नविन आवृत्तीमध्ये घेतले जातील. नोटेशन आणि गायक श्री दिप्तेश मेस्त्री. न्हावेली, ता. सावंतवाडी यांनी केले आहे तर कवी तथा आरती लेखन शामसुंदर राऊळ,रा.मळगांव ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

कोकण रेल्वेची ३५ वर्षे: विलीनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर; श्रीकांत सावंत यांचा केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल

रत्नागिरी/सिंधुदुर्ग दि.१५: कोकण रेल्वेने आपल्या स्थापनेची ३५ वर्षे पूर्ण केली असली, तरी आजही ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या मुख्य प्रवाहापासून दूर ‘कॉर्पोरेशन’ म्हणून का राबवली जात आहे? असा संतप्त सवाल मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी उपस्थित केला आहे. १० वर्षांच्या आत विलीनीकरण होणे अपेक्षित असताना ३५ वर्षे उलटणे हा कोकणवासीयांचा विश्वासघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आकडेवारी काय सांगते? (का आवश्यक आहे विलीनीकरण?)
विलीनीकरण न झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीवर प्रकाश टाकताना सावंत यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले:
प्रचंड कर्जभार: कोकण रेल्वेवर आजही हजारो कोटींचे कर्ज आहे. कॉर्पोरेशन असल्यामुळे व्याजाचा बोजा वाढतो, जो विलीनीकरण झाल्यास केंद्र सरकार उचलते.
दुपदरीकरणाचा संथ वेग: ७४१ किमी पैकी केवळ अल्प भागाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. भारतीय रेल्वेत विलीनीकरण झाल्यास निधीचा ओघ वाढून हे काम युद्धपातळीवर होऊ शकते.
प्रवासी दर: कॉर्पोरेशन असल्याने अनेकदा कोकण रेल्वेचे तिकीट दर (Basic Fare) हे भारतीय रेल्वेच्या तुलनेत अधिक असल्याचे जाणवते.
स्थानिक नेत्यांना विचारला जाब
श्रीकांत सावंत यांनी कोकणातील दिग्गज नेत्यांकडे या प्रश्नाचे उत्तर मागितले आहे. त्यांनी म्हटले की:
“केंद्रात नारायण राणे साहेब मंत्री होते, सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सांभाळले, आता विनायक राऊत, उदय सामंत, दीपक केसरकर यांसारखे ताकदवान नेते सत्तेत किंवा विरोधी पक्षात आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही कोकण रेल्वेचे विलीनीकरण का रखडले? हे सर्वच राजकीय पक्षांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.”
कोकणवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन
“आता कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, तर ‘कोकणचा सुपुत्र’ म्हणून आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन सावंत यांनी केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या माध्यमातून हा लढा आता अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आजपर्यंत अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या आता आपली पालखी आपण उचलायची म्हणून कोमसापची निर्मिती” : मधु मंगेश कर्णिक

मधुभाई – साहित्य, समाज कृतज्ञता सोहळ्याचे रत्नागिरीत मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कोमसापचे संयुक्त आयोजन*

रत्नागिरी दि.१५: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अर्थात मधुभाई – साहित्य समाज कृतज्ञता सोहळा रत्नागिरी येथील वि. दा. सावरकर सभागृहात अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी नाम. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते मधुभाईंचा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपकार डॉ विश्वास पाटील, प्रा. अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, कोमसाप अध्यक्षा सौ.नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ.प्रदीप ढवळ, रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे तसेच प्रशासकीय अधिकारी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी सोहळ्याची सुरुवात सत्कारमूर्ती आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, डॉ.विश्वास पाटील, प्रा.अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, सौ.नमिता कीर, प्रा. डॉ.प्रदीप ढवळ आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी प्रा.अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, डॉ.विश्वास पाटील, रत्नागिरी नगराध्यक्षा सौ.शिल्पा सुर्वे आदी मान्यवरांचा कोकण मराठी साहित्य परिषदच्या वतीने शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत तसेच अभिजात मराठीच्या सन्मानार्थ “मी मराठी” हे सुमधुर गीत सादर केले. यावेळी मधुभाईंच्या सखोल जीवनाचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ.प्रदीप ढवळ यांनी तर सूत्रसंचालन सचिव माधव अंकलगे यांनी केले.
उद्घाटनपर कार्यक्रमानंतर सोहळ्याचा मुख्य गाभा म्हणजेच मधुभाईंच्या प्रकट मुलाखतीला सुरुवात करण्यात आली. ही मुलाखत घेण्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे, गीतकार अरुण म्हात्रे, प्रा.डॉ.प्रदीप ढवळ, सौ.नमिता कीर आणि निवेदक अभिजित हेगशेट्ये उपस्थित होते. यावेळी मुलाखतीची सुरुवात करताना प्रा. अशोक बागवे यांनी वंदन करणे म्हणजे काय..? हे स्पष्ट करताना “वदन जिथे झुकते ते वंदन” असे म्हणत आदरणीय मधुभाईंना वंदन केले आणि कोमसापची कल्पना कशी सुचली..? यावर त्यांना बोलते केले. मधुभाईंनी सुहास्य वदने उत्तर दिले…” आपण अ.भा. सा. संमेलनाचा अध्यक्ष झालो त्यावेळी कोकणातून केवळ दोन जणांना मतदान होते आणि केवळ बृहन्महाराष्ट्राच्या जोरावर आपण निवडून आलो होतो. भविष्यात कोकणातील दुसऱ्या कोणा साहित्यिकाला अशी अडचण येऊ नये, कोकणातून साहित्यिक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने आणि आजपर्यंत अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या आता आपली पालखी आपण उचलायची म्हणून आपण कोमसापची निर्मिती केल्याचे ते म्हणाले. आपण वाचलेल्या अनेक पुस्तकांमध्ये आपल्याला कोकण, शेती, आंबे, डोंगर माझे भंडारी, गाबीत बांधव कुठेच भेटली नाही म्हणून आपल्या मराठी साहित्यातून कोकणाचे वैभव उभे केल्याचे ते अरुण म्हात्रेंच्या प्रश्नावर उत्तरले.
लंडनमध्ये शेक्सपियरचे त्याच्या वस्तू जतन केलेले स्मारक पाहिले. त्यामधून प्रेरणा घेऊन आपले महान साहित्यिक केशवसुतांचे देखील स्मारक असावे या उद्देशाने लोकांकडून १०/१२ हजार रुपये देणगी गोळा करून केशवसुत स्मारकाची सुरुवात केली. मी ते उभारले नाही तर तुम्ही लोकांनी हळूहळू ते उभे केले आणि जे उभे राहिले आहे त्यात मी समाधानी आहे, असे सौ.नमिता कीर यांच्या प्रश्नावर ते बोलले.
अपयशाने मला यश दिले. जास्त काही न शिकलेल्या माणसाने नाथ पै ज्ञान प्रबोधिनी सुरू करून कणकवलीला परवड करून शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी गावात शिक्षणाची सोय केली कारण आपण १०/१२ किमी चालत जाऊन शिक्षण घेतले होते तशी इतरांची अवस्था होऊ नये असे ते प्रा.ढवळ यांच्या प्रश्नावर उत्तरले. नाथ पै सोबत कट्टा सुकळवाड भागात फिरताना भूक लागली असता एका म्हातारीच्या घरात नाथ पै यांनी पेज मागितली असता, नाथ पै हे नाव ऐकताच म्हातारीने चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवून आम्हा दोघांनाही गाडगेभर पेज करून वाढल्याची त्यांनी आठवण सांगितली यातून जुन्या राजकारण्यांवर लोकांचे किती प्रेम होते हे दाखवून दिले.
अभिजात मराठीवर बोलताना ते म्हणाले, आपण १ली ते १० वी ची पुस्तके वाचली. पहिलीच्या पुस्तकात पहिली दोन पाने चित्रच आहेत. मुलांना चित्र दाखवू नका, त्यांना शब्दांमधून त्याची कल्पना करू द्या. काही पुस्तकात “मी पाणी पिलो, जंगलात खूप हत्या पाहिले, मुर्त्या पाहिल्या….” अशाप्रकारचे अशुद्ध मराठी लिहिलेले आढळले. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढत मराठी भाषा मंत्री नाम.उदय सामंत यांना शुद्ध मराठी भाषा पाठ्यपुस्तकात असावी अशी प्रेमळ सूचना केली. यावर मंत्रीमहोदयांनी देखील आपण जे जे म्हणाल ते होईल असे आश्वस्त केले. मधुभाईंनी रॅपिड प्रश्नांची दिलेली अफलातून उत्तरे पाहता ९६ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर देखील त्यांची बुद्धी आणि स्मृती किती विलक्षण आहे याची जाणीव झाली. गीतकार अरुण म्हात्रे यांनी सुरेश भटांची *”दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळजात कळ अजून.”*…या गझलने प्रकट मुलाखतीची सांगता केली.

*”हा देवदूत कोणी खोदीत बसला तेजाची लेणी”* : डॉ.विश्वास पाटील
पानिपतकार डॉ.विश्वास पाटील यांनी मधुभाईंच्या संपूर्ण लेखन कार्यावर स्तुतीसुमने उधळली आणि “हा देवदूत कोणी खोदीत बसला तेजाची लेणी” असे गौरवोद्गार काढले. वयाच्या ९६ वर्षात ९० पुस्तकांचा प्रपंच हा आपल्या हयातीत आपल्याला पेलणार नाही असे सांगत डॉ.पाटील यांनी भाईंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भाईंनी त्यांच्या लेखनात जी भर घातली ती मराठी समीक्षकांना जोखायला देखील कमी पडणार असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी कोमसापचे जयू भाटकर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले तर रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी समाजाला दिशा देणारे मधुभाईंचे साहित्य असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.

*”दोन मालवणी नाटकांनी मालवणी भाषा साता समुद्रापार गेली; एक गंगाराम गव्हाणकर यांचे “वस्त्रहरण” आणि मधु मंगेश कर्णिक लिखित “केला तुका झाला माका”: नाम.डॉ.उदय सामंत*
मधुभाई – समाज साहित्य कृतज्ञता सोहळ्यात मराठी भाषा मंत्री नाम. डॉ. उदय सामंत यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचे काम मच्छिंद्र कांबळी यांनी भूमिका केलेल्या व कोकणचे सुपुत्र गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण या नाटकाने केलं यात वादच नाही परंतु, मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचं काम एक नव्हे तर दोन नाटकांनी केलं आणि ते दुसरं नाटक म्हणजे मधु मंगेश कर्णिक लिखित “केला तुका झाला माका” असे स्पष्ट विधान केले. या नाटकांमध्ये भूमिका कोणी केली हे जसं महत्त्वाचं आहे तसंच ते लिहिलं कोणी हे देखील महत्त्वाचे आहे. आपल्या या भूमिकेवर कोणीतरी वाद देखील करतील परंतु, आपण नेहमीच स्पष्ट बोलतो आणि महाराष्ट्रभरचे वाद आपण सोडवतो त्यात असा छोटासा वाद झाला तर तो सोडविण्यासाठी सुद्धा आपण तयार असल्याचे ते म्हणाले. काश्मीरला सुद्धा मराठी भाषेचे गाव करतो आहोत तसेच जेएनयु मध्ये कुसुमाग्रजांच्या नावे मराठीचे अध्यापन केंद्र सुरू केलं असून जेएनयुची मुले शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्यावर डॉक्टरेट करतात, याचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला. काहीच दिवसात नाशिक येथे होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात अनुवाद अकादमी स्थापन करण्याचा निर्णय देखील मराठी भाषा मंत्रालयातर्फे आपण घेत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे परदेशातील मुलांना ऑनलाइन मराठी शिकविण्यासाठी उपक्रम देखील लवकरच सुरू करत असल्याबाबत माहिती दिली. राजकारणात नाना दंडवतेंच काम जेवढं अनमोल आहे तेवढेच साहित्य क्षेत्रात मधुभाईंचं काम अतुलनीय असे आहे, असे गौरवोद्गार नाम.सामंत यांनी काढले व मधुभाई सांगतील तशी कोमसाप भविष्यात पुढे जाईल असे आश्वस्त केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मधुभाईंनी नाम.उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनांसाठी त्यांचे आभार मानले व सावंतवाडी, वेंगुर्ला ते डहाणू पर्यंत १३ बोलीभाषा बोलल्या जातात, तरीसुद्धा मराठी ही एक आहे. आमची आई मराठी आणि बाप महाराष्ट्र आहे. आम्ही आंबा काजू वर खुश आहोत, तुम्ही द्राक्ष, डाळिंब इथे लावण्याचा प्रयत्न करू नका अशी हात जोडून विनवणी करत मधुभाईंनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या भविष्यातील वाटचालीबाबत दिशा दाखविली.
कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वितेसाठी नाम.डॉ.उदय सामंत, कोमसापच्या अध्यक्षा सौ नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा डॉ प्रदीप ढवळ, रत्नागिरी जिल्ह्याचे कोमसाप मंडळ, मराठी भाषा मंत्रालय, जिल्हा प्रशासन रत्नागिरी यांनी अतुलनीय योगदान दिले. सचिव माधव अंकलगे यांनी सर्वांचे आभार मानले. सावंतवाडीहून तालुकाध्यक्ष दीपक पटेकर माजी तालुकाध्यक्ष संतोष सावंत अभिमन्यू लोंढे राजू तावडे संतोष पवार आदीसह जिल्हाभरातून साहित्यिक कवी व कोमसाप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’-पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

 


पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कुणकेश्वर चरणी पूजन 

सिंधुदुर्गनगरी दि १५: कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

आज त्यांनी प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिर येथे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. दर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, “कुणकेश्वर हा केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. या भागाच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, यात्राकाळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते, असे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

महाशिवरात्री विशेष: ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने महाराष्ट्र दुमदुमला

बारा ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांत भक्तांचा महासागर

परळी दि.१५: ‘बम बम भोले’, ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘हर हर महादेव’ अशा अखंड जयघोषाने आज संपूर्ण महाराष्ट्र शिवभक्तीत न्हाऊन निघाला आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्वच लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर किलोमीटर्सच्या रांगा लागल्या असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.

ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे:

परळी (वैद्यनाथ) प्रभू वैद्यनाथाची आज अलंकारिक महापूजा करण्यात आली. दागदागिन्यांनी मढवलेले देवाचे मनोहारी रूप पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. आज सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडणार आहे.

वेरूळ (घृष्णेश्वर): येथे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर: नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात देशभरातून भाविक आले असून, संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भीमाशंकर मंदिर बंद; स्थानिक मंदिरांत गर्दी
पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे मंदिर विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी यंदा भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. असे असूनही, परंपरेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा पार पडली. मंदिर बंद असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी स्थानिक मंदिरांत, विशेषतः पिंपळे सौदागरमधील पेशवेकालीन मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.

मुंबई आणि उपनगरांत शिवोत्साह
बाबुलनाथ मंदिर (मुंबई): दक्षिण मुंबईतील या ऐतिहासिक मंदिरात मध्यरात्रीपासून २ ते ३ किमी लांब रांगा लागल्या आहेत. उन्हाचा तडाखा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

अंबरनाथ: ९६६ वर्ष जुन्या अंबरनाथच्या शिवमंदिरात बनारसवरूनही भाविक आले आहेत. सुरक्षेसाठी यंदा गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे.

प्राचीन मंदिरांचा वारसा आणि धार्मिक सोहळे
बीड (कनकालेश्वर): १२ व्या शतकातील सरोवराच्या मध्यभागी असलेल्या या हेमाडपंती मंदिरात पहाटे महापूजा झाली. रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे.

पुणे (ओंकारेश्वर): मुठा नदीकाठी शंखनाद आणि फुलांच्या सजावटीने भाविकांचे स्वागत करण्यात आले.

माजलगाव: येथे तहसीलदारांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

आवाहन: भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी शिस्त पाळावी आणि उन्हापासून संरक्षणासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.शिवशंभोची नांवें 

ओम पिनाकपाणी
ओम महेश्वर
ओम आशुतोष
ओम महादेव
ओम श्रीशंकर
ओम उमापती
ओम पशुपतीनाथ
ओम महाकाल
ओम चंद्रमौळी
ओम शंभो
ओम मंगेश
ओम निळकंठ
ओम त्र्यंबक
ओम गंगाधर
ओम रामेश्वर
ओम विश्वनाथ

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

ऐतिहासिक श्री नागनाथ मंदिर महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

तेरवण-मेढे येथील ऐतिहासिक श्री नागनाथ

दोडामार्ग दि.१४ : तेरवण-मेढे येथील ऐतिहासिक श्री नागनाथ मंदिर महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज झाले असून यंदा महाराष्ट्र व गोव्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते. अज्ञातवासात असताना पांडवांनी मंदिराची उभारणी केल्याची आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे.
मंदिरातील स्वयंभू शिवलिंग, गाभाऱ्यातील ‘दुग्ध कुंड’ तसेच वर्षभर पाण्याची पातळी स्थिर राहणारे ‘नानातळी’ ही भाविकांसाठी आकर्षणाची केंद्रे आहेत. व्याधीमुक्तीसाठी या तळीत पंचधातूच्या प्रतिमा अर्पण करण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिराच्या शिखराचे काम अंतिम टप्प्यात असून शासनाकडून मंजूर निधीतून सभामंडपाचे बांधकाम सुरू आहे. भाविकांसाठी भक्तनिवास, प्रशस्त मैदान आणि स्वतंत्र बदलण्याच्या खोल्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
मंदिराच्या प्रलंबित विकासकामांसाठी दानशूर भाविकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

अभिनेता अभिनय बेर्डे यांचे सावंतवाडीत शानदार एन्ट्री

सावंतवाडीत ‘व्हॅलेंटाईन डे’ ला ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटने’च्या कार्यक्रमासाठी ते प्रथमच शहरात अभिनेता अभिनय बेर्डे यांच्या काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत सहभागी माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर सोबत कणकवली नगरपरिषद नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष अॅड दिलीप नार्वेकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते

अभिनेता अभिनय बेर्डे यांच्या हस्ते  ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटने’चे उद्घाटन करताना सोबत माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर  कणकवली नगरपरिषद नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष अॅड दिलीप नार्वेकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 “लोकांची कामे करा, निधीची कमतरता भासू देणार नाही!” – आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी येथे आमदार केसरकर यांच्या हस्ते न्हावेली पं. स. नवनिर्वाचित सदस्य शरद धाऊसकर यांचा विशेष सत्कार करताना सोबत संजू परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई गणेशप्रसाद गवस आदी

सावंतवाडी दि.१४: तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील घवघवीत यशानंतर, नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी न्हावेली पंचायत समिती गणाचे सदस्य शरद धाऊसकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
💡 केसरकरांचा कानमंत्र: “जनतेचा विश्वास सार्थ ठरवा, विकासकामांसाठी निधी आम्ही देऊ!”

सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी न्हावेली पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य शरद धाऊसकर यांचा आमदार केसरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, तसेच सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई आणि गणेशप्रसाद गवस यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आगामी काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563