17.3 C
New York
Wednesday, September 23, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 94

कणकवलीच्या वैभवात भर: ८ कोटींचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ साकारणार!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रकल्पास मान्यता; १९ फेब्रुवारीला भव्य भूमिपूजन

कणकवली दि.१६:मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा एक भव्य प्रकल्प कणकवली शहरात साकारला जात आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारातून आणि दूरदृष्टीतून कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारले जाणार असून, यासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक प्रकल्पाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी, शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

हे सांस्कृतिक भवन केवळ एक इमारत नसून ते कला, संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र ठरेल. २८ गुंठे शासकीय जागेवर उभारल्या जाणाऱ्या या भवनात खालील सुविधा असतील:
अश्वारुढ पुतळा: प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा.
अद्ययावत नाट्यगृह: ५०० आसनक्षमता असलेले सुसज्ज नाट्यगृह.स्पर्धा परीक्षा केंद्र: १५० विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.महिला सक्षमीकरण: महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह.इतर सोयी: आर्ट गॅलरी, निवास व्यवस्था, सुसज्ज पार्किंग आणि सुंदर गार्डन.

सकल मराठा समाजात आनंदाचे वातावरण
या प्रकल्पाच्या नियोजनासाठी कणकवली शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत, लवू वारंग आणि सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

“कणकवलीतील मराठा समाजाची ही अनेक वर्षांची मागणी होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रशासकीय मान्यता मिळवून दिली, त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे,” असे नेत्यांनी नमूद केले.

या नियोजित बैठकीला आणि पत्रकार परिषदेला संतोष राऊळ, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, बँक संचालक समीर सावंत, पंचायत समिती सदस्य सोनू सावंत, बबलू सावंत, महेश सावंत यांच्यासह तालुक्यातील मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष राऊळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत भवनाची संकल्पना मांडली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर ‘विराट’ विजय; ६१ धावांनी धुव्वा उडवत भारत सुपर-८ मध्ये!

विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर ‘विराट’ विजय; ६१ धावांनी धुव्वा उडवत भारत सुपर-८ मध्ये!

कोलंबो दि. १६: टी-२० विश्वचषकातील सर्वात बहुप्रतीक्षित आणि हायव्होल्टेज सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव करत आपला दबदबा कायम राखला आहे. कोलंबोच्या मैदानावर रंगलेल्या या थरारक लढतीत भारताने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानला नमवून स्पर्धेच्या सुपर-८ फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

ईशान किशनचे वादळ; भारताचे १७५ धावांचे आव्हान
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली होती. मात्र, सलामीवीर ईशान किशनने मैदानाचा ताबा घेत पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली. किशनने आक्रमक ७७ धावांची खेळी साकारत संघाच्या धावसंख्येचा पाया रचला. त्याला तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी मोलाची साथ दिल्याने भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या साईम अयूबने तीन बळी घेतले, पण तो भारतीय धावगती रोखण्यात अपयशी ठरला.

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; पाकिस्तान ११४ वर ढेपाळला
१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची दाणादाण उडाली. जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पांड्या या जोडीने सुरुवातीच्या षटकांतच पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानचा उस्मान खान (४४ धावा) एकाकी झुंज देत होता, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही साथ मिळाली नाही. भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी मधल्या फळीला स्थिरावू दिले नाही. संपूर्ण पाकिस्तानी संघ अवघ्या ११४ धावांत तंबूत परतला.

सामन्याचे ठळक मुद्दे:
सामनावीर: ईशान किशन (७७ धावा).
यशस्वी गोलंदाज: बुमरा, पांड्या, अक्षर आणि वरुण यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
निकाल: भारताचा ६१ धावांनी विजय आणि सुपर-८ मध्ये धडक.

“या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून, कोलंबोच्या मैदानावर तिरंगा डौलाने फडकला आहे.”

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

संवेदना : सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांना मातृशोक

कै.तेतेबाई उर्फ सुमती मंगेश कल्याणकर

बांदा, दि.१६: तेतेबाई उर्फ सुमती मंगेश कल्याणकर यांचे आज दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने बांदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते व लेखापरीक्षक साईप्रसाद कल्याणकर यांच्या मातोश्री होत. अत्यंत सोशिक व मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्वांना परिचित होत्या.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बबन डिसोझांच्या पाठपुराव्याला यश! गोविंद चित्र मंदिर ते भटवाडी रस्त्यावरील खड्डे अखेर बुजले! 🛣️✅

सावंतवाडी दि.१६: गेल्या ६ महिन्यांपासून गोविंद चित्र मंदिर ते भटवाडी रस्त्यावर खड्ड्यांनी नागरिक त्रस्त होते. वारंवार होणारे अपघात आणि प्रवासाची दैना पाहून सामाजिक कार्यकर्ते श्री. बबन डिसोझा यांनी नगरपरिषदेकडे सतत पाठपुरावा केला.

त्यांच्या या कार्यामुळे अखेर प्रशासनाने रस्त्यावरील धोकादायक खड्डे डांबर-खडीने बुजवले आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणाऱ्या बबन डिसोझा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे! 👏✨

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी: बॅ. नाथ पै सभागृहाचा ‘फसवा’ लूक!

सावंतवाडीत बॅ. नाथ पै सभागृहावर लाखो खर्चूनही खुर्च्यांची वानवा! 🎭❌

सावंतवाडी दि.१६: नगरपरिषदेच्या बॅ नाथ पै सभागृहाचे नूतनीकरण झाले पण खुर्च्या कुठे गेल्या? मोडक्या खुर्च्या आणि सुविधांअभावी नाटक आयोजक हैराण. नामवंत कलाकारांनीही व्यक्त केली नाराजी. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन!
#Sawantwadi #NathPaiAuditorium #Drama #SocialIssue #KonkanNews #MarathiNews

नूतनीकरण की नुसतीच सजावट? 🤔
सावंतवाडीच्या बॅ. नाथ पै सभागृहात खुर्च्यांची कमतरता आणि मेकअप रूममध्ये गैरसोय. आयोजकांना बाहेरून आणाव्या लागतात खुर्च्या! नाट्यप्रेमींमध्ये संतापाची लाट. 🚩

https://youtube.com/shorts/arsfyte_72A?si=CPGQ449QDLOVs0ng

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

अपघाताची भीषण घटना: सातार्डा येथील प्रशांत बागकर यांचे गोवा-कुठ्ठाळी येथे निधन

प्रशांत गजानन बागकर

सातार्डा आणि गोवा परिसरात हळहळ व्यक्त

कुठ्ठाळी/सातार्डा दि. १६ : नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास असलेले आणि सातार्डा (तरचावाडा) येथील मूळ रहिवासी प्रशांत गजानन बागकर (५०) यांचा काल सकाळी गोवा येथील कुठ्ठाळी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. दुचाकी आणि कदंबा बस यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेमुळे संपूर्ण सातार्डा आणि गोवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास कुठ्ठाळी येथे घडली. प्रशांत बागकर हे आपल्या दुचाकीवरून सातार्डा येथून वास्कोच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या कदंबा बसशी त्यांची जोरदार धडक झाली. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धार्मिक कार्यक्रमासाठी गावी आले होते प्रशांत बागकर हे कामाच्या निमित्ताने गोव्यात असायचे. शनिवारी सातार्डा-तरचावाडा येथील महापुरुष मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी ते आपल्या कुटुंबासह मूळ गावी आले होते. पूजा आटोपून परत कामावर जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. प्रशांत बागकर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे एका हसतखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 🛑/——–/——-/—–/🛑——🛑 *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————– ◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज* _____________________ 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________ 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क : 📱9422054887,8275659563

🚨 मोठी बातमी: गुजरातमध्ये शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी! 🚨

 

अहमदाबाद आणि वडोदरा हादरले! २५ हून अधिक नामांकित शाळांना आले ‘धमकीचे ई-मेल’. पहा काय आहे सद्यस्थिती…👇

📍 काय घडले?
अहमदाबाद दि.१६: आज (१६ फेब्रुवारी) सकाळी अहमदाबादमधील १५ आणि वडोदरामधील ११ पेक्षा जास्त शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

🛡️ प्रशासनाची तत्परता:
शाळांचे कॅम्पस तातडीने रिकामे करण्यात आले आहेत. 🏃‍♂️💨बॉम्ब शोधक व निकामी पथक (BDDS) आणि पोलीस घटनास्थळी दाखल.
प्रत्येक वर्ग आणि कोपऱ्याची कसून तपासणी सुरू आहे.
✅ दिलासादायक अपडेट:
सुदैवाने, आतापर्यंतच्या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. पोलीस सायबर सेलच्या मदतीने ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. 🔍

📢 प्रशासनाचे आवाहन:
“नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परिस्थिती नियंत्रणात आहे.”
पालकांनो सावधान! अफवा पसरवू नका, अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या संपर्कात राहा.

#GujaratNews #Ahmedabad #Vadodara #SchoolAlert #BreakingNews #BombThreat #SafetyFirst #MarathiNews #SecurityAlert

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मोपा विमानतळ परिसरात कार रेसिंग दरम्यान भीषण आग

मोपा विमानतळ परिसरात धुराचे लोट

मोपा विमानतळ परिसरात कार रेसिंग स्पर्धा काही काळ थांबवली

मोपा (गोवा) दि.१६ : गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार रेसिंग इव्हेंटला काल आगीचे गालबोट लागले. रेसिंग ट्रॅकच्या मध्यभागी असलेल्या सुक्या गवताला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले, ज्यामुळे ही स्पर्धा काही काळासाठी स्थगित करावी लागली.

काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रेसिंग ट्रॅकच्या अंतर्गत भागात असलेल्या सुक्या कुरणाला ही आग लागली.
घटनेची माहिती मिळताच पेडणे, म्हापसा आणि पिरण (पिरणा) येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील देसाई, ज्ञानेश्वर सावंत, फटू नाईक आणि विठ्ठल परब या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या आगीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा साहित्याचे मोठे नुकसान झाले नसले, तरी स्पर्धकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही स्पर्धकांनी आयोजकांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
“या आगीचा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि विमानतळाला कोणताही धोका नाही.”

मिळालेल्या माहितीनुसार, आयोजकांनी या इव्हेंटसाठी अग्निशमन दलाचा ‘ना हरकत’ (NOC) दाखला घेतला होता का, याची चौकशी आता प्रशासन करत आहे. या परिसरात यापूर्वी १५ तारखेलाही मोठी आग लागली होती, ज्यामुळे मोपा परिसरातील सुक्या गवतामुळे आगीचे धोके वाढत असल्याचे दिसून येत आहे.

परिसरात अज्ञात व्यक्तींकडून सिगारेट ओढून टाकली जात असल्याने किंवा निष्काळजीपणामुळे अशा आगी लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आकेरी येथील श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्र अन् भव्य रथोत्सवाचा जल्लोष

आकेरीत १७ फेब्रुवारीला रंगणार सोहळा

आकेरी दि.१५: कुडाळ तालुक्यातील आणि सावंतवाडी शहरालगत असलेल्या आकेरी येथील जागृत देवस्थान, श्री देव रामेश्वर यांचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. त्यापूर्वी रविवार, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी
मंदिरात १२ फेब्रुवारीपासूनच उत्सवाला सुरुवात झाली असून, दररोज रात्री पुराण वाचन आणि पालखी सोहळा साजरा केला जात आहे.

रविवार, १५ फेब्रुवारी (महाशिवरात्र): पहाटे ५ वाजल्यापासून अभिषेक, गारहाणे आणि पूजा अर्चा विधी सुरू आहेत.

१७ फेब्रुवारी: भव्य रथोत्सव सोहळा
उत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या मंगळवारी सायंकाळपासून कार्यक्रमांची विशेष रंगत पाहायला मिळेल:सायंकाळी ४ वाजता: सुश्राव्य गीत गायनाचा कार्यक्रम.रात्री: ढोल-ताशांच्या गजरात श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल.रथोत्सव: पालखीनंतर या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव सोहळा दिमाखात संपन्न होईल.

सांगता: उत्सवाची सांगता श्री यक्षणी दशावतार नाट्य मंडळ (माणगाव) यांच्या दशावतारी नाटकाने होणार आहे. “महाशिवरात्र आणि रथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, आकेरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कणकवली नागवे रस्त्यावर गवारेड्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ऐटीत उभा असलेला गवारेडा

कणकवली दि.१५ : शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागवे रस्त्यावर रविवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजता महाकाय गवारेडा अचानक रस्त्यात आल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांच्या आडवा उभा राहत असल्याने काही काळ वाहतूक मंदावली.
सध्या तालुक्यातील काही गावांमध्ये जंगलातून बाहेर पडून गवारेडे भरवस्तीत फिरताना दिसत असल्याने शेतकरी, नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित गवारेड्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ विलास कोरगावकर यांनी चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागवे रोड परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563