
कणकवली दि.१५ : शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागवे रस्त्यावर रविवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजता महाकाय गवारेडा अचानक रस्त्यात आल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांच्या आडवा उभा राहत असल्याने काही काळ वाहतूक मंदावली.
सध्या तालुक्यातील काही गावांमध्ये जंगलातून बाहेर पडून गवारेडे भरवस्तीत फिरताना दिसत असल्याने शेतकरी, नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित गवारेड्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ विलास कोरगावकर यांनी चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागवे रोड परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


