पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रकल्पास मान्यता; १९ फेब्रुवारीला भव्य भूमिपूजन
कणकवली दि.१६:मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा एक भव्य प्रकल्प कणकवली शहरात साकारला जात आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारातून आणि दूरदृष्टीतून कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारले जाणार असून, यासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक प्रकल्पाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी, शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
हे सांस्कृतिक भवन केवळ एक इमारत नसून ते कला, संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र ठरेल. २८ गुंठे शासकीय जागेवर उभारल्या जाणाऱ्या या भवनात खालील सुविधा असतील:
अश्वारुढ पुतळा: प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा.
अद्ययावत नाट्यगृह: ५०० आसनक्षमता असलेले सुसज्ज नाट्यगृह.स्पर्धा परीक्षा केंद्र: १५० विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.महिला सक्षमीकरण: महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह.इतर सोयी: आर्ट गॅलरी, निवास व्यवस्था, सुसज्ज पार्किंग आणि सुंदर गार्डन.
सकल मराठा समाजात आनंदाचे वातावरण
या प्रकल्पाच्या नियोजनासाठी कणकवली शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मराठा समाजाचे नेते एस.टी. सावंत, लवू वारंग आणि सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
“कणकवलीतील मराठा समाजाची ही अनेक वर्षांची मागणी होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रशासकीय मान्यता मिळवून दिली, त्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे,” असे नेत्यांनी नमूद केले.
या नियोजित बैठकीला आणि पत्रकार परिषदेला संतोष राऊळ, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, बँक संचालक समीर सावंत, पंचायत समिती सदस्य सोनू सावंत, बबलू सावंत, महेश सावंत यांच्यासह तालुक्यातील मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष राऊळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत भवनाची संकल्पना मांडली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रकल्पास मान्यता; १९ फेब्रुवारीला भव्य भूमिपूजन