सावंतवाडी दि.१४: सावंतवाडीची चिमुरडी नृत्या जांभोरे हिने मृत्यूवर मात करून अखेर ही लढाई जिंकली आहे. ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण कोकणी माणसाच्या एकजुटीची आणि माणुसकीची यशोगाथा आहे. ‘नृत्या’
गेले अनेक महिने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.नृत्या आता पूर्णपणे ठिक असून धोक्याबाहेर आहे.
तिची प्रकृती सुधारल्यामुळे ती आता सुखरूप घरी परतत आहे.
नृत्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च अफाट होता, जो जांभोरे कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. अशा वेळी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.
आभाळमाया ग्रुप (मालवण कट्टा), सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आणि अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली.
संपूर्ण कोकण आणि विविध सामाजिक संघटना नृत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
नृत्याचे वडील महेश जांभोरे यांनी सर्व दात्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या:
मदत थांबवण्याचे आवाहन: नृत्या आता बरी झाली असल्याने आणि आवश्यक निधी जमा झाला असल्याने, यापुढे कोणीही आर्थिक मदत पाठवू नये. कठीण काळात ज्यांनी प्रार्थना केली आणि आर्थिक बळ दिले, त्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले आहेत.https://youtube.com/shorts/arsfyte_72A?si=CPGQ449QDLOVs0ng
“माणुसकीचा झरा अजूनही जिवंत आहे” हेच या घटनेने सिद्ध केले. सावंतवाडीच्या या चिमुरडीला नवजीवन मिळवून देण्यात सोशल मीडिया आणि कोकणी जनतेची एकजूट यशस्वी ठरली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


