सावंतवाडी दि.०५: सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरातील शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त कुड यशवंतराव सावंत-भोसले (वय ९२) यांचे बुधवारी रात्री गोव्यातील मणीपाल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक
स्व. कुड यशवंत सावंत-भोसले हे केवळ एक नाव नसून ती एक संस्था होती. त्यांची ओळख प्रगतीशील बागायतदार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात होती. शेती आणि बागायतीमधील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि व्यासंग नवीन पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला.
केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदावरून त्यांनी संस्थेच्या उभारणीत आणि प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच संस्थेने आज शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.
परिवार शोकाकुल
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा: अच्युत सावंत-भोसले (कार्याध्यक्ष, भोसले नॉलेज सिटी),सून, तीन मुली, जावई,भाऊ, भावजय, पुतणे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
स्व. सावंत-भोसले यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (५ फेब्रुवारी) सकाळी १०:३० वाजता शिरवल (ता. दोडामार्ग) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. समाजाच्या सर्व स्तरांतून, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com