सावंतवाडीत निवडणूक यंत्रणा सज्ज
सावंतवाडी दि.०५: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा बिगुल वाजला असून, सावंतवाडी तालुक्यातील १४३ मतदान केंद्रांवर शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत तयारी केली असून तब्बल ८५८ कर्मचारी या प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
निवडणुकीचे थोडक्यात स्वरूप
सावंतवाडी तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १८ पंचायत समिती निर्वाचण गण आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्याची सांख्यिकी माहिती खालीलप्रमाणे आहे:
एकूण मतदान केंद्रे: १४३ (१३८ मूळ + ५ सहाय्यकारी) एकूण मतदार संख्या: १,०४,०००, पुरुष मतदार: ५१,९०० | स्त्री मतदार: ५२,१००
विशेष केंद्रे: धवडकी नं. २ (माडखोल) येथे ‘सखी मतदान केंद्र’ (पूर्णतः महिला कर्मचारी) तर माजगाव नं. २ येथे ‘आदर्श मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे.
मतदान पथके उद्या होणार रवाना
शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून मा. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी (सावंतवाडी नगरपरिषद) येथे मतदान साहित्याचे वाटप सुरू होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता १८ एसटी बसेस, १ मिनीबस आणि १८ खाजगी वाहनांतून ही पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना होतील.
प्रत्येक पथकात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशा एकूण ६ जणांचा समावेश असून, देखरेखीसाठी २० झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतमोजणी ९ फेब्रुवारीला
७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व ईव्हीएम (EVM) मशीन्स पुन्हा ज्ञानप्रबोधिनी येथे जमा करण्यात येतील. यानंतर संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे असणार असून, सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.
प्रशासनाने मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563


