365 चाळ्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चरणी नतमस्तक होताना भाजपा युवा नेते विशाल परब व पदाधिकारी कार्यकर्ते
सावंतवाडी दि.०५: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच सावंतवाडी शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक पूजा सोहळ्यानिमित्त आज भाजप युवा नेते विशाल परब यांनी देवस्थानात भेट देत दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी श्री देव उपरलकर चरणी सर्वसामान्य जनतेला सुख, समाधान व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला भरघोस यश मिळावे, असे साकडे देव चरणी घातल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. यावर्षीही या उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अभिषेक पूजा सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली आहे.
या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने विशाल परब यांनी देवस्थानात उपस्थित राहून आशीर्वाद घेतले. भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887