पिझ्झा-बर्गरच्या जमान्यात मराठी अस्मितेची ‘थाळी’ संकटामार्गावर

पारंपरिक खाद्यपदार्थांकडे ग्राहकांची पाठ

मुंबई दि.०६: ज्या महाराष्ट्राच्या मातीने जगाला पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि सोलकढीसारखे अमृततुल्य पदार्थ दिले, आज त्याच मातीत मराठमोळी खाद्यसंस्कृती डबघाईला येत असल्याचे चित्र दिसत आहे. तांदळाची भाकरी महाग वाटणाऱ्या ग्राहकाला परकीय ‘डोसा’ आणि ‘बर्गर’ स्वस्त वाटू लागल्याने, आपली पारंपरिक खाद्यसंस्कृती टिकवण्यासाठी आता लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तुलना महागाईची की मानसिकतेची?
सोशल मीडियावर सध्या एका पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बदलत्या खाद्य संस्कृतीवर मार्मिक भाष्य केले जात आहे. यात मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे डोळ्यांत अंजन घालणारे आहेत:

भाकरी विरुद्ध डोसा: १५ रुपयांची तांदळाची भाकरी महाग वाटते, पण त्याच तांदळापासून बनलेला १००-१५० रुपयांचा डोसा चवीने खाल्ला जातो.

बटाटावडा विरुद्ध बर्गर: २० रुपयांचा वडा महाग वाटतो, पण ९९ रुपयांचा मॅकडोनाल्ड बर्गर खरेदी करताना महागाई जाणवत नाही.

पुरणपोळी विरुद्ध ढोकळा: अत्यंत मेहनतीची २५-३० रुपयांची पुरणपोळी लुटल्यासारखी वाटते, तर चण्याच्या पिठाचा १०० ग्रॅम ढोकळा ५० रुपयांनाही योग्य वाटतो.

सण आणि फराळ: घरगुती भाजणीची चकली आणि लाडूंपेक्षा आज पिझ्झा आणि केक सणांची शान बनत चालले आहेत.

मराठी पदार्थ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर
थालीपीठ, आंबोळी, सोलकढी, उकडीचे मोदक आणि अळूवडी यांसारख्या पदार्थांना मराठी ग्राहकच पाठ फिरवत असल्याने हे पदार्थ बाजारात दुर्मिळ होत चालले आहेत. हॉटेल व्यवसायातील आकडेवारीनुसार, तरुण पिढी पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीपेक्षा फास्ट फूडला अधिक पसंती देत आहे, ज्यामुळे अनेक मराठी खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

परंपरा जपूया, महाराष्ट्र वाढवूया!
“आपल्या घरगुती उद्योगांना आणि मराठी पदार्थांना प्रोत्साहन दिले तरच आपली संस्कृती टिकेल,” असे आवाहन आता विविध स्तरांतून केले जात आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर आग्रहाने महाराष्ट्रीयन पदार्थांची मागणी करणे, हा केवळ पोटाचा प्रश्न नसून ती आपली संस्कृती वाचवण्याची चळवळ आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे: आपली परंपरा जपण्यासाठी आणि मराठी उद्योजकांना बळ देण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ मंत्राचा अवलंब करत महाराष्ट्रीयन पदार्थांची खरेदी वाढवणे काळाची गरज बनली आहे.

🛑/——–/——-/——-/——-/🛑——/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here