सावंतवाडीत अपक्षांचा बोलबाला

सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या विजयी उमेदवार सुश्मिता जाधव विजयी खूण दाखवताना सोबत शिंदे शिवसेनेचे माजी सभापती अशोक दळवी व अन्य

महायुतीच्या बालेकिल्ल्यात ‘अदृश्य शक्ती’ची चर्चा!

सावंतवाडी दि.०९: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी सावंतवाडी तालुक्यात राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण केली आहे. अनेक महत्त्वाच्या जागांवर प्रस्थापित पक्षांना धूळ चारत अपक्ष उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः माडखोल आणि इन्सुली सारख्या मतदारसंघात अपक्षांनी मिळवलेल्या विजयामुळे “या अपक्षांचा किंगमेकर नेमका कोण?” अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे.
निकाल एका नजरेत:
१. जिल्हा परिषद गट (विजेते)
आरोंदा: सुदन कवठणकर (महायुती)
मळेवाड: अपर्णा सातोसकर (भाजप)
माजगाव: विक्रांत सावंत (भाजप) – ३४७६ मताधिक्याने विजयी झाले आहेत.
इन्सुली: नितीन राऊळ (अपक्ष)
तळवडे: संदीप गावडे (भाजप)
कोलगाव: मायकल डिसोझा (अपक्ष)
आंबोली: शोभा गावडे (भाजप)
माडखोल: शिवानी संजय नाईक (अपक्ष) विजयी झाले आहेत.

२. पंचायत समिती गण (विजेते)
बांदा: ऋतिका नाईक (अपक्ष) – भाजपच्या रुपाली शिरसाट यांचा पराभव.
आरोंदा: नेहा कांबळी (भाजप/महायुती)
सातार्डा: उदय पारिपत्ये (शिवसेना ठाकरे)
मळेवाड: धनश्री हेमंत मराठे (भाजप)
न्हावेली: शरद धाऊसकर (शिवसेना)
माजगाव: जितेंद्र गावकर (अपक्ष)
चराठा: उत्कर्षा गावकर (शिवसेना – शिंदे गट)
इन्सुली: सदाशिव राणे (अपक्ष)
शेर्ले: महेश धुरी (भाजप – बिनविरोध)
मळगाव: गौरव मुळीक (भाजप)
तळवडे: सुश्मिता जाधव (महायुती) – सभापती पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
कोलगाव: प्रणाली टिळवे (शिवसेना)
कारीवडे: प्राजक्ता केळुसकर (भाजप)
आंबोली: मायकल डिसोझा (शिवसेना)
विलवडे: प्रशांत सुकी (भाजप)
माडखोल: अवनी राऊळ (अपक्ष)
कलंबिस्त: प्रथमेश राऊळ (अपक्ष)

‘माडखोल’मध्ये भाजपला मोठा धक्का
माडखोल मतदारसंघात जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीच्या जागांवर अपक्षांनी कब्जा केला आहे. जिल्हा परिषदेसाठी अपक्ष शिवानी नाईक यांनी भाजपच्या सुप्रिया मडगांवकर यांचा पराभव केला. तर पंचायत समितीमध्ये प्रथमेश राऊळ आणि अवनी राऊळ या अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना धोबीपछाड दिली आहे.

“किंगमेकर” कोण? चर्चेला उधाण
सावंतवाडी तालुक्यातील या निकालांनी राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “जनशक्ती विरुद्ध धनशक्ती” अशा घोषणा निवडणुकीत दिल्या जात होत्या, मात्र प्रत्यक्षात अपक्षांच्या विजयाने समीकरणे बदलली आहेत. निष्ठावंतांना डावलल्याने महायुतीच्या शक्तीला हा सुरुंग लागला का? आणि या अपक्ष उमेदवारांच्या मागे असलेली ‘अदृश्य शक्ती’ नेमकी कोणाची? असा प्रश्न आता सामान्य जनतेला सतावत आहे.

तळवडे पंचायत समिती सदस्यपदी महायुतीच्या सुश्मिता जाधव विजयी झाल्याने, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here