अपघाताची भीषण घटना: सातार्डा येथील प्रशांत बागकर यांचे गोवा-कुठ्ठाळी येथे निधन

प्रशांत गजानन बागकर

सातार्डा आणि गोवा परिसरात हळहळ व्यक्त

कुठ्ठाळी/सातार्डा दि. १६ : नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास असलेले आणि सातार्डा (तरचावाडा) येथील मूळ रहिवासी प्रशांत गजानन बागकर (५०) यांचा काल सकाळी गोवा येथील कुठ्ठाळी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. दुचाकी आणि कदंबा बस यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेमुळे संपूर्ण सातार्डा आणि गोवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास कुठ्ठाळी येथे घडली. प्रशांत बागकर हे आपल्या दुचाकीवरून सातार्डा येथून वास्कोच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या कदंबा बसशी त्यांची जोरदार धडक झाली. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रशांत यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. धार्मिक कार्यक्रमासाठी गावी आले होते प्रशांत बागकर हे कामाच्या निमित्ताने गोव्यात असायचे. शनिवारी सातार्डा-तरचावाडा येथील महापुरुष मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी ते आपल्या कुटुंबासह मूळ गावी आले होते. पूजा आटोपून परत कामावर जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. प्रशांत बागकर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे एका हसतखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 🛑/——–/——-/—–/🛑——🛑 *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————– ◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज* _____________________ 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________ 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क : 📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here