सावंतवाडी दि.२२: राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ‘महास्वच्छता अभियानात’ लोकप्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली.
स्वच्छतेसाठी सामूहिक पुढाकार
या मोहिमेचे नियोजन नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रामुख्याने सालईवाडा परिसरातील रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे, तर स्थानिक महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
शहर सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी: ॲड. निरवडेकर
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले की,
“संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा जो विचार दिला, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आपले शहर आणि आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यास सावंतवाडी शहर अधिक देखणे होईल.”
यांची लाभली उपस्थिती
या मोहिमेत आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, परिक्षित मांजरेकर, नगरपरिषदेचे विनोद सावंत, गजानन परब, अनिकेत पाटणकर, संकल्प धारगळकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सालईवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानाच्या शेवटी, सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून प्रभागातील परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल देव्या सुर्याजी यांनी सर्व सहभागी नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


