सावंतवाडी, दि. २६ : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजचा वैयक्तिक अजेंड्यासाठी वापर होत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेने शासकीय योजना जसे स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा यांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया पेज सुरू केले होते. मात्र अलीकडील दोन दिवसांत या पेजवरून विरोधी पक्षावर टीका करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पहिल्या मासिक सभेतील ऑनलाइन सहभागाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने घेतलेला तांत्रिक आक्षेप योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषदेचा कारभार नियमांवर चालतो, भावनिक भूमिकांवर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या अधिकृत पेजवरील आक्षेपार्ह कॉमेंट्स एकाच घराण्याकडून येत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. तसेच उपनगराध्यक्षांवर विश्वास नसल्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, उद्या होणाऱ्या नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत मागील सभेसारखा वाद टाळून शहराच्या विकासावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांची असल्याचे त्यांनी नमूद केले.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


