✍🏼 *सिंधुदुर्गनगरी* दि.२७ : जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका दिनांक ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार असून, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. जिल्हाधिकारी तुप्ती धोडमिसे यांनी अधिकृत निवड कार्यक्रम जाहीर केला आहे.
९ फेब्रुवारी रोजी जि.प. व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर निवड प्रक्रियेच्या तारखा निश्चित झाल्याने सर्व पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.
सभापती, उपसभापती तसेच अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले असून, सत्तासमीकरणे जुळविण्यासाठी पडद्यामागील घडामोडींनाही वेग आला आहे. विशेषतः पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषदेत कोणाचा झेंडा फडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील आठवडाभर राजकीय हालचालींचा जोर वाढणार असल्याचे चित्र आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


