युद्धभूमीतून मायदेशी सुखरूप परतावा; सावंतवाडीचे डॉ. मसुरकर कुटुंब अखेर मुंबईत दाखल

सावंतवाडी दि.१०: कुवेत आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या १० दिवसांपासून आखाती देशात अडकलेले सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉ. प्रवीण मसुरकर, त्यांची पत्नी डॉ. प्राजक्ता मसुरकर आणि मुलगा कौस्तुभ मसुरकर हे मंगळवारी (१० मार्च) सायंकाळी मुंबई विमानतळावर सुखरूप पोहोचले. विसाव्याच्या अडचणी आणि युद्धाचा थरार अनुभवल्यानंतर हे कुटुंब मायदेशी परतल्याने मसुरकर कुटुंबियांसह सावंतवाडी शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

युद्धाच्या सावटाखाली १० दिवस:
डॉ. प्रवीण मसुरकर यांचा मोठा मुलगा सौरभ हा अमेरिकेत आयटी इंजिनिअर असून नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याचे लग्न झाले होते. त्याला भेटण्यासाठी डॉ. प्राजक्ता मसुरकर जानेवारीत अमेरिकेला गेल्या होत्या. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी डॉ. प्रवीण मसुरकर आणि त्यांचा दुसरा मुलगा कौस्तुभ (सिव्हिल इंजिनिअर, पुणे) हे भारत-कुवेत-इराण मार्गे अमेरिकेला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, त्याच दिवशी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्याने त्यांचे विमान कुवेतमध्ये थांबवण्यात आले.

मिसाईलचा मारा आणि सायरनचा थरार:
कुवेत विमानतळाची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याने विमान सेवा विस्कळीत झाली होती. विमानतळापासून ४० किमी अंतरावरील एका हॉटेलमध्ये मसुरकर कुटुंबाला आश्रय घ्यावा लागला. “आकाशात सतत होणारा मिसाईलचा मारा आणि शहरात वारंवार वाजणारे धोक्याचे सायरन अशा अत्यंत भीतीदायक वातावरणात आम्ही १० दिवस काढले,” असे डॉ. मसुरकर यांनी सांगितले.

सावंतवाडीकरांचे परदेशात मोलाचे सहकार्य:
या कठीण काळात कुवेतमध्ये वास्तव्यास असलेले सावंतवाडीतील उभा बाजार येथील सौ. प्रतिभा कारेकर आणि कोलगाव-निरुखेवाडी येथील आसिफ पटेल यांनी मसुरकर कुटुंबाला मोठा आधार दिला. हे कुटुंबीय दररोज हॉटेलवर येऊन त्यांची चौकशी करत, धीर देत आणि त्यांना घरचा पाहुणचारही उपलब्ध करून देत होते. या मदतीबद्दल डॉ. मसुरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

असा झाला परतीचा प्रवास:
कुवेतची धावपट्टी निकामी झाल्याने मायदेशी परतणे कठीण झाले होते. अखेर सोमवार, ९ मार्च रोजी या कुटुंबाला सौदी अरेबियाचा विझा मिळाला. त्यानंतर कुवेतमधून बसने ते सौदी अरेबियाला पोहोचले. तेथून मंगळवारी दुपारी विमानाने प्रवास करून सायंकाळी हे कुटुंब सुखरूप मुंबईत दाखल झाले.

ईश्वरी कृपा आणि परमपूज्य भाऊ मसुरकर यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही या संकटातून सुखरूप बाहेर पडलो, अशी भावना मसुरकर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. तसेच, अद्यापही आखाती देशांत अडकलेले इतर भारतीय नागरिक लवकरच मायदेशी परतावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here