सावंतवाडीत श्री रामनवमी निमित्त २८ मार्चला एकदिवसीय रामकथा सोहळा

सावंतवाडी दि.२०: इस्कॉन (ISKCON) तर्फे श्री रामनवमी निमित्त एकदिवसीय रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून भाविकांना श्रीरामभक्तीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा रामकथा सोहळा दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच महाप्रसादाचा समावेश असणार आहे.
या प्रसंगी प्रख्यात प्रवचनकार दामोदर सखा प्रभुजी (एम.बी.ए., दिल्ली) हे रामकथेचे निरूपण करणार आहेत. श्रीरामचंद्रांच्या कृपेचा लाभ मिळावा व भक्तीभाव वाढावा, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण हरिकृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी, सावंतवाडी येथे असून सर्व भक्तांनी उपस्थित राहून रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here