वनांच्या रक्षणासाठी ३२ हजार हात सरसावले;  ३२० गावांत घुमणार ‘अग्निमुक्त वन’ची गर्जना भारतीय वन कायद्याच्या शताब्दी वर्षाचे औचित्य;  सामूहिक शपथेचे आयोजन सिंधुदुर्ग दि.२२:

सिंधुदुर्ग दि.२२: निसर्गाने हजारो वर्षांत निर्माण केलेली वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी  संपूर्ण कार्यक्षेत्रात “अग्निमुक्त वन शपथ” हा भव्य लोकसहभाग कार्यक्रम राबविण्यात आला. ‘भारतीय वन कायदा, १९२७’ या ऐतिहासिक कायद्याला २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण जनजागृती मोहीम ठरला आहे.

एकाच वेळी, ३२० गावांत संकल्प
वनक्षेत्राला लागून असलेल्या आणि वनलगतच्या एकूण ३२० गावांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी पार पडला आहे. प्रत्येक गावातून किमान १०० ग्रामस्थ सहभागी झाले असून, जवळपास ३२,००० नागरिक एकत्र येऊन आपली वने आगीपासून सुरक्षित ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली आहे .

प्रशासकीय यंत्रणा सज्ज
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक, क्षेत्रीय वन अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक यांना विशेष सूचना देण्यात आल्या . केवळ सरकारी औपचारिकता न ठेवता, हा कार्यक्रम एक लोकचळवळ बनावा यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांशीही समन्वय साधण्यात आला आहे. वनाग्नीमुळे काही तासांतच पाणी, माती, हवामान आणि वन्यजीवांचे होणारे अपरिमित नुकसान टाळणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

भविष्यातील पिढ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’
वने ही केवळ झाडे नसून ती मानवी जीवनाचा आधार आहेत. वनाग्नी प्रतिबंधासाठी वन कर्मचारी आणि स्थानिक समुदाय यांच्यातील समन्वय बळकट करणे हा या उपक्रमाचा गाभा आहे. ग्रामस्थांमध्ये वनांविषयी कर्तव्यभावना निर्माण व्हावी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग शिल्लक राहावा, यासाठी हा ‘सार्वजनिक संकल्प’ अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

वनविभागाच्या वतीने सर्व निसर्गप्रेमी नागरिक, तरुण मंडळे आणि महिला बचत गटांना या ‘अग्निमुक्त वन’ मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here