माजी आ. वैभव नाईक यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन जल्लोषात

वैभव नाईक यांना केक भरवताना पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक व पदाधिकारी.

कुडाळ दि.२५ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ–मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे बुधवारी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. गुरुवार, दि. 26 मार्च रोजी वाढदिवस असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभव नाईक यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, उपनेत्या जान्हवी सावंत, वैभव नाईक यांची पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक, मुलगी नंदीनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, रूपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, तालुका संघटक सचिन कदम, बबन बोभाटे, संदीप महाडेश्वर, अमित राणे, गोट्या चव्हाण, बाबी गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले, आज वैभव नाईक माजी आमदार असले तरी उद्या ते पुन्हा आमदार होणार आणि भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सभागृहातील परिस्थितीचा उल्लेख करत, आज सत्तेतील मंत्री स्वतःच आपण मार खाल्ल्याचे सांगत आहेत, यावरून राज्यातील राजकारणाची दिशा लक्षात येते, असे म्हटले.उपरकर यांनी निवडणुकीतील आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपले चार प्रामाणिक कार्यकर्तेही मोठे परिवर्तन घडवू शकतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत.असे आवाहन केले.
वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात पराभवानंतरही न डगमगता पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. आज माझा पराभव झाला असला तरी याच उर्जेने मी काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी लोकांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे,असे हे आताच झालेल्या निवडणुकींने दाखवून दिले.निवडणुका काही वेळा पैशाच्या जोरावर जिंकता येतात, पण संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही,पैसे खर्च करून निवडून आलेले काही लोक मतदारसंघात फिरताना दिसत नाहीत, पण आम्ही मात्र लोकांसाठी कायम उभे राहणारे आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मी घेतलेल्या भूमिकेमुळे मला धमक्या देण्यात आल्या, पण हे माझं वैयक्तिक काम नव्हतं. विरोधात राहिल्यामुळे त्रास सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.राजकीय पक्षांतरावर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.आज काही लोक सत्तेत गेले असतील, पण त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही. खरी ताकद ही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येच असते,असे ते म्हणाले.रामनवमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भूमिकेचा उल्लेख करत,मी अयोध्येला जाणार नाही, पण माझ्या मतदारसंघात रामनवमी साजरी करणार आहे,असे सांगितले. शेवटी त्यांनी देवाकडे प्रार्थना करत, मला चांगली बुद्धी दे, कुणासमोर लाचार होऊ देऊ नको आणि लोकसेवा करण्याची ताकद दे,अशी भावना व्यक्त केली. तसेच आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया,असे आवाहनही त्यांनी उपस्थित पदाधिकारी -कार्यकत्यांना करताच उपस्थितीतामधुन टाळ्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
जान्हवी सावंत, अमरसेन सावंत, अतुल बंगे, कृष्णा धुरी यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना म्हटले, राज्यात निष्ठावंत आमदार म्हणून तुमची ओळख आहे. भविष्यात तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने दशावतार कलाकारांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कुडाळ येथील रिक्षा व्यावसायिकांसाठी विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सातेरी दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here