सावंतवाडी दि.२६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ‘तिरंगा प्रभाग संघा’च्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या महिलांच्या यशामुळे सावंतवाडी तालुक्याचा लौकिक वाढला असून, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
’सिंधू सरस’च्या माध्यमातून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इन्सुलीच्या तिरंगा प्रभाग संघाच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. ‘खेळ पैठणीचा’ या लोकप्रिय स्पर्धेत ग्रामसखी दिव्या देसाई (डेगवे) यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारत प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस पटकावले. तसेच, पाककला स्पर्धेत आपल्या हातातील चवीची जादू दाखवत रोणापाल येथील एलआरपी (LRP) नमिता शेगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले कसब सिद्ध केले.
यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमधील ग्रुप डान्स स्पर्धेत इन्सुलीच्या ‘श्री देवी माऊली कला मंडळा’ने अत्यंत प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिरंगा प्रभाग संघाच्या महिलांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचे नसून, ग्रामीण भागातील महिलांमधील संघटनशक्ती आणि आत्मविश्वासाचे उत्तम प्रतीक मानले जात आहे. या यशस्वी महिलांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
[26/03, 12:13] HP: 🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


