सावंतवाडी दि.२८: शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शहरातील घरगुती व सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी आता पालिकेचे स्वतःचे आधुनिक ‘सक्शन मशीन’ दाखल झाले आहे. पालिकेच्या या पुढाकारामुळे आता नागरिकांना अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली.
खाजगी ठेकेदारांच्या जाचातून सुटका
यापूर्वी शहरात शौचालय उपसण्यासाठी खाजगी ठेकेदारांकडून मशीन भाड्याने घेतली जात होती. यासाठी नागरिकांना मोठा खर्च करावा लागत असे. मात्र, आता पालिकेने स्वतःचे अडीच हजार लिटर क्षमतेचे मशीन खरेदी केल्याने सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात ही सेवा मिळणार आहे.
अरुंद गल्ल्यांमध्येही पोहोचणार सेवा
शहरातील अंतर्गत भागातील रस्ते आणि गल्ल्या अरुंद असल्याने मोठ्या गाड्या तिथे पोहोचू शकत नव्हत्या. मात्र, हे नवीन मशीन आणि गाडी आकाराने छोटी असल्यामुळे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात ती सहजपणे फिरवता येणार आहे. या गाडीवर पालिकेचे कर्मचारीच कार्यरत राहणार असल्याने कामकाजात पारदर्शकता आणि तत्परता राहील.
सोमवारी होणार लोकार्पण
शनिवारी या नवीन गाडीची पाहणी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली. येत्या सोमवारी नगराध्यक्ष आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या मशीनचे रितसर उद्घाटन करण्यात येणार असून, त्याच दिवसापासून ही सेवा जनतेसाठी खुली केली जाईल, असे आडीवरेकर यांनी स्पष्ट केले.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


