मळगाव येथे महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद; श्री देव मायापूर्वचारी चरणी विजयाचे साकडे

सावंतवाडी दि. २६ तालुक्यातील मळगाव येथे भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार संदीप गावडे आणि मळगाव-नेमळे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार गौरव मुळीक यांच्या प्रचारार्थ श्री देव मायापूर्वाचारी मंदिरात श्रीफळ ठेवून विजयाचे साकडे घालण्यात आले.प्रचाराच्या शुभारंभावेळी महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येऊन भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता प्रस्थापित व्हावी, असे गाऱ्हाणे मायापूर्वचारी चरणी घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. देवदर्शनानंतर उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:हनुमंत पेडणेकर (सरपंच, मळगाव)गणेशप्रसाद पेडणेकर (माजी सरपंच तथा भाजप शक्ती केंद्रप्रमुख)चंद्रकांत जाधव (भाजप जिल्हा सरचिटणीस)निलेश कुडव (माजी सरपंच)सिद्धेश तेंडोलकर (भाजप सावंतवाडी तालुका चिटणीस)ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निकिता राऊळ, बूथ अध्यक्ष महेश गवंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मळगाव येथील ब्राम्हण पाट परिसरातील वाड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. दोन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. “युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि भविष्यातील संकल्प” मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here