
सावंतवाडी दि.०३: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या १२ एप्रिल रोजी शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथे “शेती वाचवा, शेतकरी वाचवा” या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शेतकरी प्रश्नांवर मोठा एल्गार पुकारला जाणार असल्याची माहिती संघटक समितीचे प्रमुख कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे आणि धोंडीबा कुंभार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शेतकरी नेते खासदार राजाराम सिंग असणार आहेत, तर परिषदेचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील हे स्वागताध्यक्ष असून, अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरुषोतम शर्मा, राजेंद्र बावके, उद्धव शिंदे, किशोर ढमाले आणि एस. व्ही. जाधव यांसारखे दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ऐरणीवर परिषदेत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करून लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे:
वन्यजीव संघर्ष: जंगली प्राण्यांचे वाढते हल्ले, पिकांचे नुकसान आणि मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई.
जमीन संपादन: महामार्ग व विविध प्रकल्पांसाठी कवडीमोल भावाने होणारे शेतजमिनींचे संपादन.
आर्थिक संकट: बियाणे, खते व औषधांचे वाढते दर आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव.
पर्यावरण ऱ्हास: बेकायदेशीर जंगलतोड, खाणकाम आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे शेती व मत्स्यव्यवसायावर होणारे दुष्परिणाम.
स्वामीनाथन आयोग: आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ.
कोकणातील शेतकऱ्यांना आवाहन यापूर्वी कोकणातील काजू आणि आंबा उत्पादकांनी आपापल्या परीने आंदोलने करून या प्रश्नांची तीव्रता सरकारला दाखवून दिली आहे. मात्र, आता एकत्रित धोरण आखून निर्णायक लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि कोकण विभागातील शेतकरी, महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शाहूवाडी येथील परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे व धोंडीबा कुंभार यांनी केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


