सावंतवाडी दि.०४: शहरातील द्वारका नगरी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने चौथ्या मजल्यावर ट्यूबलाईट जोडायला गेलेल्या रुबी खातून मुन्ना खान (२० वर्षे) यांचा खाली पडून मृत्यू झाला.
📍 नेमकी घटना काय?
द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे काम सुरू आहे.शुक्रवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास रुबी खातून यांच्या खोलीतील लाईट गेल्याने त्या पतीसोबत ट्यूबलाईट आणण्यासाठी चौथ्या मजल्यावर गेल्या होत्या.
अंधारात ट्यूबलाईट जोडत असताना तोल गेल्याने त्या खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या.तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मयत महिला मूळची बिहारची असून, नातेवाईक आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. घटनास्थळी पोलीस प्रशासनाने भेट दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


