विदर्भ होरपळला! अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी, ऑटोमध्ये आढळला मृतदेह

अकोला, दि-१५: अकोल्यात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शहरातील मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा अंदाज अकोला पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकतोय अन् नागरिक होरपळून निघत आहे. अकोला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले होते. पुढील काही दिवस अकोल्यात उष्णतेचा इशाराही दिला होता. याच उष्मघातामुळे अकोल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यूमागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे.. काल अकोल्यातील तापमान जगातील दुसऱ्या क्रमांकावर होतं.. 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात नोंदविण्यात आलं होतं. विदर्भातील ४ जिल्हे देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामध्ये अकोल्याचे नाव आघाडीवर आहे. ४ दिवसांपासून अकोल्यात सूर्य आग ओकतोय.

मागील काही दिवसातील अकोल्यातील तापमान
14 एप्रिल : 44 अंश सेल्सियस.
13 एप्रिल : 43.8 अंश सेल्सियस.
12 एप्रिल : 43.1 अंश सेल्सियस.
11 एप्रिल : 42.1 अंश सेल्सियस.
10 एप्रिल : 40.1 अंश सेल्सियस.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here