सावंतवाडी दि.१७:“लोकांना धूळ खायला लावू नका आणि सावंतवाडीकरांच्या संयमाचा अंत पाहू नका!” अशा कडक शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख सजू परब यांनी MNGL च्या अधिकाऱ्यांना झापले.
📍 काय घडलं?
सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईनचे काम सायंकाळच्या गर्दीच्या वेळीही सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. ही माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेतली.🔥अधिकारी निरुत्तर: सायंकाळी गर्दीच्या वेळी काम सुरू ठेवून रस्ता अडवल्याने संजू परब यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भररस्त्यात फैलावर घेतले.
मुख्याधिकाऱ्यांना जाब: “रात्री काम करण्याची परवानगी दिली आहे का?” असा सवाल करत त्यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन लावून जाब विचारला.
धुळीचे साम्राज्य: काम झाल्यावर रोलर न फिरवल्याने शहरात धूळ उडत आहे, त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी सत्यवान बांदेकर, श्री. सावंत आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“लोकांना त्रास होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तात्काळ रस्ते व्यवस्थित करा, अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे!” — संजू परब (जिल्हाप्रमुख, शिवसेना)
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/ *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.१७: