दोन लाख ५५ हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
कुडाळ दि.२९: बसस्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना एका प्रवाशी महिलेच्या पर्समधून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या चोरीत सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले असून, याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुप्रिया सचिन पेंडूरकर (वय ३९, सध्या रा. अंधेरी, मुंबई; मूळ रा. चौके कुळकरवाडी, ता. मालवण) या आपल्या पतीसह गावी धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. बुधवारी सकाळी तेजस एक्स्प्रेसने प्रवास करून त्या दुपारी २ वाजता कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरल्या. त्यावेळी त्यांच्याकडील पर्समध्ये दागिन्यांचे पाऊच सुरक्षित होते.
रेल्वे स्थानकावरून रिक्षाने त्या कुडाळ बसस्थानकावर आल्या. दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ-पेंडूर-मालवण मार्गावरील एसटी बस फलाटावर लागली. गर्दी असल्याने पती सचिन हे आधी बसमध्ये चढले आणि त्यांच्या पाठोपाठ सौ. सुप्रिया बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये सीटवर बसल्यावर पर्सची चेन अर्धवट उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी पर्स तपासली असता, त्यातील सोन्याच्या दागिन्यांचे पाऊच गायब असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी बसमध्ये आणि परिसरात शोधाशोध केली, मात्र पाऊच मिळून आले नाही.
या चोरीत सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार, दोन बांगड्या, अंगठी आणि कानातले बट्टू असा एकूण २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाला आहे. या घटनेनंतर सौ. सुप्रिया यांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सखाराम भोई पुढील तपास करत आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


