दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल; १६ लाख विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
मुंबई/पुणे दि.०७: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल अखेर उद्या, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला वैयक्तिक निकाल पाहता येईल. या घोषणेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद
निकालाची अधिकृत घोषणा करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत राज्याचा एकूण निकाल, मुला-मुलींच्या निकालाची टक्केवारी आणि विभागावार निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता लिंक सक्रिय होईल.
निकाल कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल: mahahsscboard.in,sscresult.mkcl.org
निकाल पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी: विद्यार्थ्यांकडे आपला बैठक क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे.यावेळच्या परीक्षेची वैशिष्ट्येपरीक्षेचा कालावधी: २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६.परीक्षा केंद्रे: राज्यभरातील ५,१११ केंद्रांवर परीक्षा पार पडली.एकूण नोंदणी: १६ लाख १५ हजार ४८१ विद्यार्थी.विद्यार्थी संख्या: ८,६५,७४० मुले आणि ७,४९,७३६ मुली.तृतीयपंथीय विद्यार्थी: १३ विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली.सहभागी शाळा: राज्यातील २३,६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींच्या संख्येत ३,८७१ ने वाढ झाली आहे. आता सर्वांचे लक्ष उद्या लागणाऱ्या निकालाकडे असून, निकालाचा टक्का वाढणार का, याबाबत शिक्षण वर्तुळात चर्चा सुरू आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


