सावंतवाडी दि.२९:
झाडावरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ओटवणे भटवाडी येथील सिद्धेश नागेश कविटकर (३९) या तरुणाचे शुक्रवारी सकाळी गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण ओटवणे गावावर शोककळा पसरली असून कविटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मध काढताना घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश कविटकर हा गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसोबत मध काढण्यासाठी ओटवणे-मांडफातरवाडी सीमेवरील खाणीजवळ गेला होता. मध काढण्यासाठी तो झाडावर चढला असताना, काही अंतरावर गेल्यावर अचानक त्याचा तोल सुटला आणि तो थेट जमिनीवर कोसळला.
उपचारादरम्यान अपयश
या भीषण अपघातात सिद्धेशच्या डोक्याला, नाकाला, तोंडाला आणि पायांना गंभीर दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने गोवा-बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
गावचा लाडका सुपुत्र हरपला…
सिद्धेश हा आपल्या मनमिळावू स्वभावामुळे संपूर्ण गावात आणि परिसरात परिचयाचा होता. त्याच्या अशा अचानक आणि अकाली जाण्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर सिद्धेशचे पार्थिव ओटवणे गावातील त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्याचा मृतदेह गावात येताच ओटवणेवासियांनी त्याच्या दर्शनासाठी आणि कविटकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिद्धेश हा नागेश कविटकर यांचा मुलगा, तर संदेश कविटकर यांंचा भाऊ होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि भावजय असा मोठा परिवार आहे.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


