स्वच्छतेसाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे पाऊल; शहरात नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून ‘आधुनिक कचरापेट्या’ दाखल

सावंतवाडी दि.३०: ‘स्वच्छ व सुंदर सावंतवाडी’चा संकल्प अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी आधुनिक कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला मोठी चालना मिळणार आहे.

ओला व सुका कचरा वर्गीकरणावर भर
काही काळापूर्वी शहरातील जुन्या कचरा कुंड्या हटवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या समस्येवर उपाय म्हणून ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत नगरपरिषदेने हे पाऊल उचलले आहे. या नवीन आधुनिक पेट्यांमध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे टाकण्याची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे कचरा वर्गीकरण करणे सोपे होणार आहे.

भटक्या प्राण्यांचा उपद्रव थांबणार
शहरातील कचरा कुंड्यांतून भटक्या कुत्र्यांकडून कचरा विस्कटला जाण्याचे प्रकार वारंवार घडत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत असे. ही बाब लक्षात घेऊन या नवीन कचरापेट्यांची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुत्र्यांना कचरा बाहेर काढता येणार नाही, परिणामी रस्ते स्वच्छ राहण्यास मदत होईल.

प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत होत असून, शहर स्वच्छतेसाठी आता सावंतवाडीकरांनीही कचरा या आधुनिक पेट्यांमध्येच टाकून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here