गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सावंतवाडीत सत्कार सोहळा; माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी दि.१०: सकल मराठा समाज, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत मुला-मुलींचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता सावंतवाडी येथील खासकिलवाडा, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीशेजारी असलेल्या मांगिरीश बँक्वेट हॉल येथे संपन्न होणार आहे.
​या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार तथा माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेच्या युवराज्ञी तथा नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले, जि.प. सदस्य विक्रांत सावंत आणि जेष्ठ नेते संदीप कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
​सकल मराठा समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष सीताराम गावडे व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, समाजबांधवांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here