
सावंतवाडी दि.१३: भाजपचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः विशेष पत्र पाठवून विक्रांत सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
📌 आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार:
लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील ‘जन आरोग्य समिती’ आणि रुग्णालयांतील ‘रुग्ण कल्याण समिती’च्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पोषण आणि शुद्ध पाण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
“या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये विक्रांत सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे पोहोचवाव्यात.”
— प्रकाश आबिटकर (आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य)
विक्रांत सावंत यांच्या या नियुक्तीमुळे सावंतवाडी आणि परिसरातील आरोग्य व्यवस्थेला मोठी गती मिळण्याची अपेक्षा असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


