ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पणजी (गोवा) दि.०८ : ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. गोव्यातील डोना पावला येथील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. नानांच्या या अकाली एक्झिटने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली असून मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलीवूडलाही मोठा धक्का बसला आहे.
​विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज नाव होते. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाची भक्कम दखल घ्यायला लावली. रंगभूमीपासून कारकीर्द सुरू करणाऱ्या नानांनी पुढे सिनेसृष्टीत पदार्पण करत एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. समांतर सिनेमांपासून ते कॉमेडी सिनेमांपर्यंत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमे आणि नाटकांमध्ये नायक, सहनायक, खलनायक व चरित्रनायक अशा विविध भूमिका साकारल्या. मराठीतील त्यांचा ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला होता.

या प्रतिमेतील संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे:
​खरं तर ‘नटसम्राट’ म्हटलं तर, जुन्या पिढीला रंगभूमीवरचे श्रीराम लागू आठवतात. पण, सिनेमे पाहून मोठे झालेल्या पिढीला, जर विचारलं तर मात्र त्यांच्या डोळ्यांसमोर रुपेरी पडद्यावर ‘नटसम्राट’ मोठा करणारे नाना पाटेकरच उभे राहतात.
​रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास –
​नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
​नाना पाटेकर यांनी ‘गमन’ 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ही भूमिका इतकी छोटी होती की, ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्ष नाना सिनेमात मिळेल ती भूमिका करत राहिले ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ या सिनेमांतही नानांनी काम केलं. यांपैकी एकही सिनेमा विशेष कमाई करू शकला नाही.
​राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आज की आवाज’ सिनेमात नाना पाटेकर सहनायक होते. नानांच्या कामाचं कौतुक झालं, पण सिनेमा काही चालला नाही. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘अंकुश’ हा सिनेमा. 1986 मध्ये आलेल्या सिनेमात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.
​’सलामा बॉम्बे’ आणि ‘परिंदा’नं ओळख निर्माण केली.
​1988 मधील ‘सलामा बॉम्बे!’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने नानांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. मात्र 1989 मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

रविवारी झालेला सम्राट इंटरनॅशनल क्लबच्या पदग्रहण समारंभ ठरला शेवटचा कार्यक्रम
नाना पाटेकर हे रविवारी 4 ऑक्टोबर रोजी पणजी गोवा येथील सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट वन च्या पदग्रहण समारंभास उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यातून रसिक मनाला अनुभवाचे बोल सांगितले विशेष म्हणजे यावेळी झालेल्या समय नृत्यांमध्ये स्वतः नृत्य मध्ये सहभागी झाले आणि डफली वाजवली. अगदी हसत खेळत सर्वांशी ते बोलत होते जणूकाही हा त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here