🚨 सावंतवाडीत मोठी दुर्घटना टळली! बाजारपेठेत चप्पल दुकानाला भीषण आग; व्यापारी व मित्र मंडळाच्या सतर्कतेमुळे शेजारील दुकाने वाचली.

🚨 📍 सावंतवाडी – बाजारपेठ

⏰ पहाटेची वेळ

येथील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक संजू निपाणीकर यांच्या चप्पल दुकानाला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानाचे ४ ते ५ लाखांहून अधिक नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

🔥 मोठा अनर्थ टळला!

पहाटेच्या वेळी लागलेली ही आग जर वेळेत आटोक्यात आली नसती, तर संपूर्ण बाजारपेठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती होती. मात्र, बाजारपेठ मित्र मंडळ आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि समयसूचकतेमुळे आग इतरत्र पसरली नाही.

🚒 अग्निशमन दलाची कामगिरी:

व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पुंडलिक दळवी यांनी तातडीने माहिती दिल्यानंतर सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अमोल शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

💪 सतर्कता ठरली महत्त्वाची:

या दुर्घटनेत निपाणीकर यांचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी व्यापारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि शेजारील सर्व दुकाने सुरक्षित बचावली आहेत.
[14/10, 08:52] HP: आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, राजू धारपवार, रामा गावडे, अर्चित पोकळे, चिरायू टोपले, सुरेश वाडकर, श्री. मुळीक, प्रसाद देऊलकर, देवबा देऊलकर, जुगनू देईलकर, शैलेश गवंडळकर, प्रसाद वागळे, राकेश चितारी, श्री. चितारी, अमित वेंगुर्लेकर आदींसह अनेक सदस्य व कार्यकर्ते तातडीने उपस्थित होते.
“नवरात्रोत्सवाच्या दिवसांत घडलेल्या या प्रसंगात जणू नवदुर्गेच्या कृपेनेच आणि कार्यकर्त्यांच्या धाडसामुळे संपूर्ण बाजारपेठ मोठा अनर्थ टळून सुरक्षित बचावली,” अशी कृतज्ञ भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here