33.1 C
New York
Saturday, July 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 10

आजगाव मायनिंग विरोधी आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा; जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांची ग्वाही

सौ.साक्षी वंजारी

सावंतवाडी दि.१७: तालुक्यातील आजगाव आणि आसपासच्या निसर्गसमृद्ध परिसरात जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या वतीने सुरू होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या मायनिंग विरोधी आंदोलनाला कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी आपला पूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केला असून, कॉग्रेस वरिष्ठ नेते लवकरच आंदोलक ग्रामस्थांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिली आहे. दरम्यान, हे आंदोलन केवळ आणि केवळ स्थानिक ग्रामस्थांच्याच नेतृत्वाखाली लढले जावे आणि ते जनतेच्या हातात राहील याची चोख दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मायनिंग सुरू करण्याच्या हालचालींचा प्राथमिक भाग म्हणून, नेमका भूभाग अधोरेखित करण्यासाठी आणि मायनिंगची खोली मोजण्यासाठी कंपनीने या भागात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजगाव व आसपासच्या परिसरात ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला आहे. सध्या जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात आहे. “ज्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला, तेव्हा या दोन्ही सत्ताधारी पक्षांचे सदस्य तोंड बंद करून का बसले होते? याचे उत्तर त्यांनी आधी जनतेला दिले पाहिजे,” असा संतप्त सवाल साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला.याला स्थानिक आमदार दीपक केसरकर हे मूग गिळून गप्प का आहेत?

पुढे बोलताना वंजारी म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही, आजगाव, धाकोरे, मातोंड यांसारख्या निसर्गसंपन्न गावांमध्ये एखादा प्रदुषणकारी प्रकल्प येत असल्याची साधी माहिती सत्ताधाऱ्यांना नसणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. कोणता प्रकल्प कुठे येणार याची पूर्ण कल्पना आधीच असल्याने, ही सत्ताधारी मंडळी आपल्या बगलबच्यांमार्फत प्रकल्पाच्या आसपासच्या जमिनी आधीच खरेदी करायला सुरुवात करतात आणि आजगावच्या बाबतीतही नेमके हेच घडले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी गावात जाऊन नौटंकी करण्यापेक्षा आपल्या सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प तातडीने रद्द करून दाखवावा, यात स्थानिक आमदार केसरकर यांनी पुढाकार घ्यावा असे थेट आव्हान कॉग्रेसने दिले आहे.

‘कळणे’च्या अनुभवातून शहाणे व्हा; दलालांपासून सावधान! “पूर्वी कळणे मायनिंग सुरू करताना जी रणनीती वापरली गेली, तीच रणनीती आजगावमध्येही वापरली जाण्याची दाट शक्यता आहे. कळणे आंदोलनाचे नेतृत्व काही ठराविक मंडळी करत होती आणि हे आंदोलन स्थानिक ग्रामस्थांच्या हातातून कधी निसटले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्या आंदोलनात मायनिंग कंपनीसाठी दलाली करणारेच पुढे सहभागी झाले होते. या अनुभवातून शहाणे होऊन आजगावच्या ग्रामस्थांनी पुन्हा तीच चूक होऊ देऊ नये. हे आंदोलन शेवटपर्यंत स्थानिक जनतेच्याच हातात राहील याची काळजी घ्यावी आणि सावध राहावे,” असे आवाहन साक्षी वंजारी यांनी केले आहे.या संपूर्ण लढ्यात कॉग्रेस ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com

🪀 *आमच्या Whatsapp  ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*  https://akhandhindustanlive.com

📹  *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

सम्राट क्लबच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या सिंधुदुर्गचे हर्ष नकाशे आणि पल्लवी पिळणकर यांची उपांत्य फेरीत धडक; अंतिम फेरी पणजी गोवा येथे २१ जूनला

सिंधुदुर्गचे हर्ष नकाशे आणि पल्लवी पिळणकर यांची उपांत्य फेरीत निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना सम्राट इंटरनॅशनल क्लब चे पदाधिकारी

सावंतवाडी दि.१७: येथे सम्राट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या तीन स्पर्धकांपैकी हर्ष नकाशे (वैभववाडी) आणि पल्लवी पिळणकर (माझगाव) यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत थेट उपांत्य फेरी (Semi Final) गाठली आहे. दोन्ही स्पर्धकांच्या या दैदिप्यमान यशामुळे सावंतवाडी परिसर आणि सम्राट क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

हर्ष आणि पल्लवी यांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेच्या, कठोर मेहनतीच्या आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर ही यशस्वी मजल मारली आहे. उपांत्य फेरीत बाजी मारल्यानंतर आता हे दोन्ही गुणवान स्पर्धक अंतिम फेरीकडे (Final) कूच करत आहेत.

या पार्श्वभूमीवर, सम्राट क्लब मयेच्या वतीने हर्ष नकाशे आणि पल्लवी पिळणकर यांना अंतिम फेरीतील यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या दोन्ही स्पर्धकांना अंतिम फेरीत जोमाने प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सम्राट क्लबचे सर्व सदस्य, हितचिंतक तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा व त्यांच्या यशासाठी सदिच्छा व्यक्त कराव्यात, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. “हर्ष आणि पल्लवी, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांत सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

🏫 यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालकांसाठी ‘परिचय व मार्गदर्शन’ सोहळा संपन्न! 🎯🎖️


सावंतवाडी दि.१६: नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या शिस्तबद्ध, संस्कारमय आणि नेतृत्वकेंद्री वातावरणाची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली.

📌 कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन:
ले. कर्नल रत्नेश सिन्हा (नि.) (सीईओ व कमांडंट): “भोसले सैनिक स्कूल ही केवळ शाळा नसून भावी नेतृत्व घडविणारी एक दर्जेदार कार्यशाळा आहे.”

सुनेत्रा फाटक (प्रशासकीय अधिकारी, भोसले नॉलेज सिटी): त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सैनिक शिक्षणाचे काय महत्त्व आहे, यावर विशेष प्रकाश टाकला.

प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस: नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन, नियम आणि विविध उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

प्रियांका देसाई (मुख्याध्यापिका, डे बोर्डिंग): सैनिक स्कूल मान्यता प्राप्तीचा प्रवास आणि शाळेच्या आगामी यशस्वी वाटचालीची माहिती त्यांनी मांडली.

✨ शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमाचे धडे!
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोनाली शेट्टी यांनी सैनिक स्कूलमधील शिक्षण ही विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम विकसित करणारी एक आदर्श जीवनशैली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा यशस्वी समारोप प्राची कुडतरकर यांनी आभार प्रदर्शनाने केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

💰 महाराष्ट्र राज्य लॉटरीत सावंतवाडीच्या भाग्यवानाला ७ लाखांची लॉटरी; ‘न्यू मॅजेस्टिक लॉटरी’ची बक्षिसांची परंपरा कायम!

💰 💥 ‘सागरलक्ष्मी’ लॉटरीच्या तिकिटाला लागलं ७ लाखांचं बंपर बक्षीस; विजेत्यावर कौतुकाचा वर्षाव!

👇 सविस्तर बातमी वाचा व शेअर करा 👇

सावंतवाडी दि.१६: महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या भाग्यवान विजेत्यांची परंपरा सावंतवाडीत यंदाही मोठ्या दिमाखात कायम राहिली आहे. येथील प्रसिद्ध ‘न्यू मॅजेस्टिक लॉटरी अँड बुक स्टॉल’मधून विक्री झालेल्या ‘सागरलक्ष्मी’ लॉटरीच्या तिकिटाला तब्बल ७ लाख रुपयांचे बंपर बक्षीस लागले आहे.

लकी तिकीट नंबर: SL-00 : 4590
सोमवार, दिनांक १५ जून रोजी झालेल्या सोडतीत सात लाखाचे बक्षीस लागले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🏆 मुक्ताई ॲकेडमीच्या दिव्यांका, हर्ष आणि बाळकृष्णची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी! सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

🏆 💥 मोठी बातमी: ६ वर्षांच्या चिमुरड्या दिव्यांकाने राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले दोन चषक; मुक्ताई ॲकेडमीला मिळाला ‘बेस्ट ॲकेडमी’ पुरस्कार!

👇 सविस्तर बातमी वाचा व शेअर करा 👇

सावंतवाडी दि.१६: सांगली येथील नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे आयोजित १८ व्या कै. बाबूकाका शिरगावकर फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका वाजवला आहे. या मानाच्या स्पर्धेत भारतातील ७ राज्यांमधील २६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

👧 ६ वर्षांच्या दिव्यांका नार्वेकरचे ऐतिहासिक यश!
मुक्ताई ॲकेडमीची आणि या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू (६ वर्षे) दिव्यांका नार्वेकर हिने केवळ दुसऱ्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत थेट दोन पारितोषिके पटकावण्याचा भीमपराक्रम केला. दिव्यांकाने ९ पैकी २ राऊंड्स जिंकून ८ वर्षांखालील मुलींच्या गटात देशात चौथा क्रमांक पटकावला. तसेच, तिला “बेस्ट परफॉर्मर यंगेस्ट गर्ल” चा विशेष चषक देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी दोन पारितोषिके मिळवणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

♟️ हर्ष राऊळ आणि बाळकृष्ण पेडणेकरची बाजी!

हर्ष राऊळ (आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू): याने ९ पैकी ५ राऊंड्स जिंकून १४ वर्षांखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक मिळवत आकर्षक चषक पटकावला.

बाळकृष्ण पेडणेकर (आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू): याने ५ राऊंड्स जिंकून आणि २ राऊंड्स बरोबरीत सोडवून रेटिंग कॅटेगरीत सहावा क्रमांक मिळवला. त्याला रोख पारितोषिक आणि आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात आले.

🥇 मुक्ताई ॲकेडमीला ‘बेस्ट ॲकेडमी’ पुरस्कार!
गेली १० वर्षे सातत्याने सिंधुदुर्गातील मुलांना बुद्धिबळाचे दर्जेदार प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या मुक्ताई ॲकेडमीला या स्पर्धेत “बेस्ट ॲकेडमी” हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ॲकेडमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर सरांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत ॲकेडमीच्या आकाश वाटवे, प्रज्वल नार्वेकर, पुष्कर केळूसकर आणि चिदानंद रेडकर यांनीही उत्कृष्ट खेळ केला. या घवघवीत यशाबद्दल मुक्ताई ॲकेडमी आणि सर्व विजेत्या बाल खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

📸 फोटो कॅप्शन: “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार स्वीकारताना मुक्ताई ॲकेडमीचे विद्यार्थी आणि कौस्तुभ पेडणेकर, विनायक नार्वेकर, दिपाली नार्वेकर!

Latest Updates साठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

चराठा पी. एम. श्री शाळेला विक्रांत सावंत यांच्याकडून इन्व्हर्टर भेट; आठ दिवसांत होणार कार्यान्वित!

✨ “शासकीय योजनेची वाट न पाहता शाळेच्या अत्यावश्यक सुविधेसाठी तातडीने सहकार्य करणार” – जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची ग्वाही

👇 सविस्तर बातमी वाचा व शेअर करा 👇

सावंतवाडी दि.१६: चराठा येथील ‘पी. एम. श्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या’ सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजना सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या अत्यावश्यक सोयी-सुविधांसाठी शासकीय निधीची किंवा योजनांची वाट न पाहता, शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य श्री. विक्रांत सावंत यांनी दिली आहे. चराठा शाळेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

💡 ८ दिवसांत इन्व्हर्टर बसवणार; विजेचा खोळंबा संपणार!
चराठा येथील या शाळेत आधुनिक शैक्षणिक तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. मात्र, अनेकदा वीज गेल्यानंतर इन्व्हर्टर नसल्यामुळे डिजिटल शिक्षणात व्यत्यय येत होता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. हीच गंभीर अडचण ओळखून विक्रांत सावंत यांनी अवघ्या आठ दिवसांत शाळेला आवश्यक त्या क्षमतेचा इन्व्हर्टर स्वखर्चाने बसवून देण्याची महत्त्वपूर्ण ग्वाही दिली. त्यांच्या या तत्परतेबद्दल शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

👥 मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला चराठा गावच्या सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच राजन परब, माजी सरपंच बाळू वाळके, ग्रामविकास अधिकारी श्रद्धा तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब, दिगंबर पावसकर, सामाजिक कार्यकर्ते राजू कुबल, बाळ्या बोंद्रे, प्रवीण सावंत, विलास परब, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, निलेश मेस्त्री, विष्णू परब, शमिका नाईक, शिक्षिका अदिती चव्हाण, अमिषा कुंभार, धनदा शिंदे, संगीत शिक्षक विजय माधव, क्रीडा शिक्षक नागेश बांदेकर आदी उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच बाळू वाळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी केले, सूत्रसंचालन शिक्षिका धनदा शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका अमिषा कुंभार यांनी केले.

Latest Updates साठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚀 सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना लवकरच; आमदार दीपक केसरकरांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक प्रतिसाद!

 

💥  रखडलेल्या ‘रिजनल प्लॅन’साठी मुंबईत महत्त्वाची बैठक; गुंतागुंतीच्या नियमांमधून सिंधुदुर्गची सुटका होणार, विकासाचा मार्ग मोकळा!

👇 सविस्तर बातमी वाचा व शेअर करा 👇

सावंतवाडी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना (एक्स्प्रेस रिजनल प्लॅन) लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी आमदार श्री. दीपक केसरकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री (तथा नगरविकास मंत्री) श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या विषयावर सर्व संबंधित विभागांची विशेष संयुक्त बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी आमदार केसरकर यांनी केली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. सचिन वालावलकर देखील उपस्थित होते.

📌 जुन्या आराखड्यामुळे विकासाला ब्रेक!
सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित झाल्यानंतर २००४ साली स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. मात्र, या आराखड्यातील तब्बल ७५ टक्के क्षेत्र हे शेती, इतर वने आणि वनक्षेत्रासाठी राखीव आहे. बदलत्या काळात सिंधुदुर्गमधील वाढत्या पर्यटनाला आणि पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी या जुन्या प्रादेशिक आराखड्यात सुधारणा करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. ४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना जाहीर झाली असली, तरी अद्याप त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झालेली नाही.

क्लिष्ट नियमांचे जाळे होणार सुटसुटीत!
सध्या जिल्ह्यात कोणतेही विकासात्मक काम करताना पर्यटन प्लॅन, सीआरझेड (CRZ), जलसंपदा नियंत्रण रेषा, झोन प्लॅन, नगरपंचायत डीपी प्लॅन, वनक्षेत्र आणि कांदळवन (मॅन्ग्रोव्हज) अशा विविध विभागांच्या क्लिष्ट कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामुळे विकासकामांच्या परवानग्या मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. हा सर्व कारभार सुलभ आणि एकसूत्री व्हावा, याकडे आमदार केसरकर यांनी लक्ष वेधले.

🤝 लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार!
सिंधुदुर्गचा सुधारित रिजनल प्लॅन तातडीने तयार व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या शाश्वत आणि गतीमान विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Latest Updates साठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आजगांव ग्रामस्थांचा तीव्र विरोध डावलून सावंतवाडीत मायनिंगसाठी ड्रोन सर्व्हे सुरू; ग्रामस्थ आक्रमक, संजू परब, वैभव नाईक, रुपेश राऊळ यांच्या मध्यस्थीनंतर वाद शांत!

💥 सावंतवाडी : आजगांव २१ गावांमध्ये सर्व्हे होणार; प्रशासनाकडून कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप!

👇 सविस्तर बातमी वाचा व शेअर करा 👇

सावंतवाडी, दि. १६:
सावंतवाडी तालुक्यातील एका गावात खाजगी कंपनीकडून मायनिंगसाठी (खाणकाम) सुरू असलेल्या ड्रोन सर्व्हेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ग्रामस्थांचा तीव्र विरोध डावलून हा सर्व्हे सुरू ठेवण्यात आल्याने स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ड्रोन खाली पाडत, संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारून धक्काबुक्की केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

📌 नेमकं काय घडलं?
वरिष्ठ स्तरावरील आदेशाचा दाखला देत एका खाजगी कंपनीने सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील तब्बल २१ गावांमध्ये हा ड्रोन सर्व्हे सुरू केला आहे. मात्र, या संदर्भात स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना कोणतीही अधिकृत पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. “ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण का केले जात आहे?” असा सवाल करत स्थानिकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला, मात्र पोलिसांनी जबाब नोंदवण्यास उशीर केल्याने नाराजी आणखी वाढली.

🤝 राजकीय नेत्यांची मध्यस्थी, प्रकरण शांत!
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली, त्यांची समजूत काढली आणि अखेर तिन्ही नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाले.

दरम्यान, या संवेदनशील सर्वेक्षणामुळे संपूर्ण परिसरात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत सुराज्य की हप्तेखोरी? डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा राजघराण्यासह सत्ताधाऱ्यांवर घणाघात! 🔥

सावंतवाडी दि.१६: सावंतवाडीचे माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि राजघराण्यातील सदस्यांवर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे:📌 संस्थानचे नाव खराब करू नका: पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुरोगामी सावंतवाडीत आज टेंडरसाठी राजवाड्यात मुजरा करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. ‘इनकमिंग’च्या नावाखाली राजघराण्याचे नाव खराब होत असून त्यांनी याचे भान ठेवावे.
📌 विकास की भ्रष्टाचार?: गॅस पाईपलाईनमुळे शहराची वाट लागली आहे. मोती तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली टक्केवारी लाटून तलाव बुजवण्याचा डाव तर नाही ना?
📌 आजगाव ड्रोन सर्व्हेला विरोध: ग्रामसभेचे ठराव धुडकावून आजगावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक का झाली नाही? अवैध मायनींगमध्ये प्रशासनाची हातमिळवणी आहे का?
📌 आम्ही ‘ब्लॅक कॅट’ कमांडो: वन्यजीव आणि पर्यावरण नष्ट करणारे प्रकल्प कोकणातच का लादले जात आहेत? विरोध केला की ‘काळी मांजर’ म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, आम्ही ‘ब्लॅक कॅट’ कमांडो आहोत!

सावंतवाडीच्या या सद्यस्थितीवर आणि झालेल्या आरोपांवर आता सत्ताधारी काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

अॅड अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस भाजपा जनसंपर्क कार्यालय आणि त्यांच्या संपर्क कार्यालयात थाटात साजरा निरवडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा; शिवराज्याभिषेक प्रतिमा व गीता पुस्तक देऊन केले सन्मानित…

​सावंतवाडी,दि.१५:येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात सकाळपासूनच ॲड. निरवडेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
​या सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्यासह उपस्थित विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन ॲड. निरवडेकर यांना दीर्घायुष्यासाठी आणि भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या आनंदाच्या क्षणी त्यांना ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ प्रतिमा भेट देऊन त्यांचा विशेष गौरवही करण्यात आला.
​ॲड. अनिल निरवडेकर यांच्या दांडग्या जनसंपर्काची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली. यावेळी उत्सवमूर्ती ॲड. निरवडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा युवानेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव आणि पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय त्यांच्या कार्यालयामध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सर्व पत्रकार मंडळींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या प्रभाग क्रमांक दहा मधील युवकांनी सुद्धा त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
​तसेच भाजपा आंबोली मंडल युवामोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर व साहिल कल्याणकर यांनीही उपस्थित राहून लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, गोविंद साटेलकर, बूथ अध्यक्ष सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडीस, गोपाळ नाईक, पुंडलिक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे, सुधीर मळीक यांच्यासह शहरातील व्यापारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563