📍 सावंतवाडी दि.२३: शहरातील कोलगाव झिरंगवाडी भागात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.
⚠️ नागरिकांचा जीव मुठीत!
मुलांना धोका: शाळकरी मुलांच्या सायकलमागे हे श्वान धावून जात असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर हल्ले: पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या अंगावरही कुत्री धावून जात आहेत.
वाहनांचे नुकसान: हे भटके कुत्रे इमारती आणि घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी व इतर वाहनांचे नुकसान करत आहेत.
⚖️ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला:
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत मार्गदर्शक आदेश पारित केले आहेत. त्यानुसार सावंतवाडी नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची रवानगी तात्काळ आश्रयगृहात (Dog Shelter) करावी, अशी मागणी ॲड. सायली दुभाषी यांनी केली आहे.
*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




पुणे (प्रतिनिधी)दि.२३:



डिचोली दि.२२: तालुक्यातील चिकणे-कुडणे परिसरात घडलेल्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील फरार संशयिताला अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मृत महिलेच्या धाकट्या मुलीशी विवाह करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून संशयिताने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

सावंतवाडी दि.२१: जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू असताना, शासकीय बैठकीचे गांभीर्य पायदळी तुडवून बांधकाम विभागाचा एक जबाबदार अधिकारी चक्क आपल्या मोबाईलवर ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात मग्न असल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीत उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, संबंधित अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्ली दि.२१: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाने जारी केलेल्या यादीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक फेरबदल करत नवीन आणि अनुभवी नेत्यांना संधी दिली आहे.
📍 सावंतवाडी दि.२०:सावंतवाडीत सर्व धर्मीय नागरिक सण-उत्सव नेहमीच गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करतात. मात्र, सध्या शहरात सुरू असलेल्या विजेच्या तीव्र लपंडावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या वीज समस्येमुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला थेट वीज वितरण कंपनी (महावितरण) जबाबदार राहील, असा इशारा शांतता समितीच्या सदस्यांनी दिला आहे.