आंगणेवाडीच्या ‘आई भराडी’ देवीची यात्रा उत्साहात सुरूवात

भराडीमातेची सजली आंगणेवाडी

उद्या पहाटे ३ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात

सिंधुदुर्ग, दि. ०८: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांचा मोठा लोंढा आंगणेवाडीत दाखल होणार असून, मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने दर्शन व सुविधांसाठी जय्यत तयारी केली आहे.
दर्शनाचे वेळापत्रक
सुरुवात: सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.०० वाजता
ब्रेक: रात्री ९ ते १२ (धार्मिक विधींसाठी दर्शन बंद)
पुन्हा दर्शन: उत्तररात्री १.०० वाजल्यापासून मंगळवार सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत
कालावधी: सामान्य रांगेतून सुमारे ३० मिनिटांत, तर मुख दर्शन रांगेतून केवळ ५ मिनिटांत दर्शन
प्रशासनाच्या सुविधा
पाणीपुरवठा: ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टँकर्सची व्यवस्था
वीज: महावितरणकडून रस्त्यांवर ९ नवीन विद्युत खांब
वाहतूक: मालवण दिशेने विशेष वाहने व रिक्षा स्टँड
स्वयंसेवक: ५०० ग्रामस्थ स्वयंसेवकांसह पंढरपूर येथील १०० स्वयंसेवक तैनात
कसे पोहोचाल?
मालवणकडून: मालवण – कट्टा – आंगणेवाडी (विशेष वाहन व्यवस्था)
कणकवलीकडून: कणकवली – आचरा रोड – आंगणेवाडी
कुडाळकडून: कुडाळ – धामापूर – आंगणेवाडी
भाविकांसाठी सूचना
दोन रांगा: प्रत्यक्ष दर्शन व मुख दर्शन
पार्किंग: स्वतंत्र पार्किंग झोन; नाममात्र शुल्क
अपंग/ज्येष्ठ नागरिक: विशेष वाहन व स्वयंसेवकांची मदत
प्लॅस्टिकमुक्त जत्रोत्सव
यंदाचा जत्रोत्सव प्लॅस्टिकमुक्त साजरा करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकांतील विजयी उमेदवारांच्या संभाव्य भेटीमुळे अतिरिक्त सुरक्षा व स्वतंत्र दर्शन रांगांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
“भाविकांनी रांगेत शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here