
सिंधुदुर्ग दि ०९: कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या पत्नी स्नेहा नाईक यांच्यासह देवीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
देवीच्या दर्शनानंतर वैभव नाईक यांनी जत्रोत्सवाच्या परिसरात असलेल्या मसुरे-पोईप आणि आंगणेवाडी शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला आणि जत्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
जनसेवेचा उपक्रम: मोफत पाणी वाटप
जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून ‘मोफत बिसलेरी पाणी वाटप’ स्टॉल उभारण्यात आला आहे. वैभव नाईक यांनी या स्टॉलला भेट देऊन स्वतः पाणी वाटप करत या उपक्रमाचे कौतुक केले.
“भराडी मातेच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण व्हावे आणि जनसेवेची ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो, हीच देवीचरणी प्रार्थना,” अशी भावना यावेळी वैभव नाईक यांनी व्यक्त केली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


