सिंधुदुर्ग दि.१२: महायुतीविरोधात काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहण्यामागे भाजपच्याच काही कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप संजू परब यांनी दोडामार्ग येथे बोलताना केला आहे. सावंतवाडी तालुका तसेच इतर भागांत भाजपशी संबंधित व्यक्तींनी स्वतःचे उमेदवार उभे केल्याचे त्यांनी सांगितले.
“शिंदे सेनेच्या एकाही कार्यकर्त्याने अपक्ष अर्ज भरला नाही; जे काही घडले ते भाजपच्या लोकांमुळे झाले,” असे सांगत त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्षांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच निवडून आलेल्या अपक्षांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणावर अंतिम निर्णय वरिष्ठ नेते नारायण राणे, निलेश राणे आणि दीपक केसरकर घेतील, असे परब यांनी नमूद केले. त्यांच्या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या पत्रकार परिषदेत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस आदी उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


