विधायक व रचनात्मक कार्यातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा नवनिर्वाचित सदस्यांना कानमंत्र

मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवनिर्वाचित जि प व पं स सदस्यांना शुभेच्छा देताना सोबत भाजप युवा नेते विशाल परब ,ॲड. अनिल निरवडेकर (प्रभारी
नगराध्यक्ष),संदीप गावडे (नवनिर्वाचित जि. प. सदस्य),गौरव मुळीक (पं. स. सदस्य),विनोद राऊळ (युवा संघटक),समीर नेमळेकर आदी

मुंबईत केला सन्मान 

सावंतवाडी दि.१३: “जनतेने मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता, विकासात्मक आणि रचनात्मक कार्यातून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा. सतत जनसंपर्कात राहून लोकांचे प्रश्न सोडवा आणि आपल्या कार्यातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा,” असे मोलाचे मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, नवनिर्वाचित सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विजयी शिलेदारांची सदिच्छा भेट
भाजपच्या या दणदणीत विजयानंतर सावंतवाडीचे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित प्रतिनिधींनी मुंबईत प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. यामध्ये खालील पदाधिकारी :ॲड. अनिल निरवडेकर (प्रभारी नगराध्यक्ष),संदीप गावडे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य),गौरव मुळीक (पंचायत समिती सदस्य),विनोद राऊळ (युवा संघटक),समीर नेमळेकर उपस्थित होते.

या भेटीमुळे नवनिर्वाचित सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला आहे.
तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन
याप्रसंगी मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “जनसेवेच्या मार्गावर यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीचा नावलौकिक वाढवण्यासाठी तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना आणि विकास पोहोचवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे.”

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here