सावंतवाडीत ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन; आमदार केसरकरांची उपस्थिती
🚩 ‘जाणता राजा’ – प्रशासनासाठी आजही आदर्श!
पालकमंत्री नितेश राणे आणि आ. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत घुमला शाहिरी बाणा!
सावंतवाडी दि.१९ : “आज आपण हिंदू म्हणून सन्मानाने श्वास घेतोय, याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांनाच जाते,” असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
शिवरायांचे विचार हेच प्रेरणास्थान
पालकमंत्री राणे म्हणाले की, शिवाजी महाराजांची युद्धनीती, प्रशासनशैली आणि रयतेस न्याय देण्याची पद्धत ही आजही आदर्श आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शिवरायांच्या विचारांवर चालत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा – केसरकर
आमदार केसरकर म्हणाले, “शेतकरी धोरण, पर्यावरण संवर्धन आणि महिलांचा सन्मान जपणारे शिवराय हे खऱ्या अर्थाने जाणते राजे होते. ते आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख प्रेरणास्थान आहेत.”
शाहिरी सादरीकरणाची रंगत
उद्घाटनानंतर लेखक-दिग्दर्शक रूपचंद चव्हाण यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमातून पोवाड्यांच्या माध्यमातून शिवचरित्र जिवंत झाले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, युवराज लखमराजे भोंसले, प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, भूसंपादन अधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील तसेच दिग्दर्शक दीपक कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर घारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीधर पाटील यांनी मानले. मोठ्या संख्येने शिवप्रेमी व शासकीय कर्मचारी उपस्थित राहिल्याने सोहळा उत्साहात पार पडला.
🛑/–/–🛑/–/–🛑/—/🛑/—🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com————————◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563,9422054887



सावंतवाडीत ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन; आमदार केसरकरांची उपस्थिती