सावंतवाडीत घुमणार महिलांच्या दशावताराचा आवाज! ‘घे भरारी’चा महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

सावंतवाडीत घुमणार महिलांच्या दशावताराचा आवाज! १ मार्च ते ३१ मार्च २०२६ (संपूर्ण महिना) आगळावेगळा उपक्रम

सावंतवाडी दि.२६: स्त्रीशक्तीचा जागर आणि त्यांच्या सुदृढ आरोग्याचा विचार करून सावंतवाडीतील ‘घे भरारी फाउंडेशन’ यावर्षी महिला दिनानिमित्त विविध अभिनव कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येत आहे. यात सर्वात मुख्य आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे महिलांनीच सादर केलेला ‘दशावतारी नाट्यप्रयोग’. कोकणी संस्कृतीचा कणा असलेला दशावतार आता महिलांच्या कलाविष्काराने शिव उद्यानात रंगणार आहे.
आरोग्यासाठी ‘फ्री झुंबा’चे आयोजन
महिला आणि युवतींच्या आरोग्यासाठी फाउंडेशनने एक महिन्याचा विशेष झुंबा क्लास आयोजित केला आहे.
कालावधी: १ मार्च ते ३१ मार्च २०२६ (संपूर्ण महिना)
वेळ: दररोज संध्याकाळी ५:३० ते ६:३०
ठिकाण: काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी
विशेष: हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून महिलांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

९ मार्चला रंगणार मुख्य सोहळा
महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता शिव उद्यान येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये
समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.
गाणी, खास नृत्य आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम.
महिलांचा दशावतारी नाट्यप्रयोग (घे भरारीच्या सदस्यांकडून सादरीकरण).बक्षिसांची लुटालूट
आकर्षक स्पॉट प्राईजेस आणि लकी ड्रॉचे आयोजन केले आहे.

या ऐतिहासिक महिला दशावतारी प्रयोगासाठी आणि कार्यक्रमासाठी परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्यकारी अध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी आणि खजिनदार स्वप्नाली कारेकर यांनी केले आहे.

चौकट
“महिलांनी केवळ घरची जबाबदारी न सांभाळता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि आपल्या कलागुणांना वाव द्यावा, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” – घे भरारी फाउंडेशन

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here