गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं म्हणून १६ संघटना एकत्र

१० मार्च रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनेचा विधिमंडळ अधिवेशनात मोर्चाचा निर्धार

सावंतवाडी,दि.२८ :गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं म्हणून १६ संघटना एकत्र आल्या आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते नेतृत्व करत आहेत. घरासाठी १ लाख ७० हजार गिरणी कामगार व वारसांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सध्या १ लाख २५ हजार अर्ज छाननी होऊन पात्र होतील.त्यांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्यासाठी येत्या १० मार्च रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनेचा विधिमंडळ अधिवेशनात निर्धार मोर्चा काढला जाणार आहे त्याला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार व वारसांची सभा श्रीराम वाचन मंदिर मध्ये आयोजित करण्यात आली होती त्यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार श्री निवृत्ती देसाई, ऑफिस सेक्रेटरी सुर्यकांत बांदलकर, सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे उपस्थित होते.
यावेळी गिरणी कामगारांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.
यावेळी बजरंग चव्हाण यांनी गिरणी कामगार संप, संघर्ष, सरकारची भूमिका आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गिरणी कामगारांना शेलू व वांगणी मध्ये घरे नको तर मुंबईत घरे हवीत यासाठी लढा उभारला त्याला यश आले आहे. मुंबई मध्ये घरं मिळावी म्हणून १६ संघटनांचा संयुक्त लढा सुरू आहे.सन १ ऑक्टोबर १९८१ च्या पुढील संपात सहभागी झालेल्या कामगारांना घर मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. गिरणी कामगार व वारसांची एकजूट दाखवून सरकारने हक्काचे घर द्यावे म्हणून निर्धार मोर्चात कामगार,वारस आणि कुटुंबातील सदस्यांनी सामिल व्हावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार श्री निवृत्ती देसाई म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघासह १६ संघटनांचा संयुक्त निर्धार मोर्चा विधानसभेवर धडकणार आहे. प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी व्हावे. महाराष्ट्र गुजरातला विलीन करणार होता ,त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढा उभारला त्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा होता. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गिरणी कामगारांच्या घराचा पाया घातला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले त्या संविधानामुळेच गिरणी कामगारांना न्याय मिळाला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी होण्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे. शंभर कोटींचे कपडे निर्माण करणाऱ्या गिरणी कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडून दिले आहे. १२५ गिरणींचे राष्ट्रीयकरण झाले त्यामुळे मुंबईत रोजगार निर्माण झाला आणि मुंबई आर्थिक राजधानी बनली हे विसरून चालणार नाही. हक्काच्या घराला अजून किती काळ गिरणी कामगारांनी वाट पाहावी. मरणाच्या दारात उभा असणारा गिरणी कामगारांचे आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला मिळवायचे असतील तर गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न त्यांनी तात्काळ सोडवावा. सेलू आणि वांगणी येथे घरे नको तर ती मुंबईतच घरे हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४० कोटी जनतेचे नेतृत्व करत आहे त्यांनी गिरणी कामगारावर कृपा करून त्यांचा शंभर टक्के मुंबईत घरे देण्याचा निर्णय घेऊन आशिर्वाद मिळवावेत.आपल्या परिसरातील खासदार, आमदारांनी सुद्धा गिरणी कामगार व वारसांच्या प्रश्न धडाडीने संसदेत आणि विधानसभेत लावून धरावा यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी गिरणी कामगार व वारस सुरेखा भिसे ,लाॅरेन्स डिसोझा,सुमन मुळीक ,सतीश निकम, रामचंद्र कोठावळे, महादेव सावंत यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक आणि आभार गिरणी कामगार संघाचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत सुभाष परब, लॉरेन्स डिसोझा ,विश्वनाथ कुबल, रामचंद्र कोठावळे आदींनी केले.
यावेळी गणपत गावडे, सोनू दळवी, सुभाष नाईक, गोविंद पालव, रेखा लोंढे देसाई, मुकुंद बाईत, जयवंती सावंत, गुरुनाथ राऊळ, अशोक केरकर, हरी कुबल, अशोक दळवी, राजन देसाई ,देवराव देसाई, दशरथ नाईक, प्रकाश राऊळ ,अनुप्रिया बाईत, कविता गावडे, प्रेमानंद परब,गिता परब यांच्यासह सुमारे १५० गिरणी कामगार व वारस उपस्थित होते.
यावेळी विधानसभेवर काढण्यात येणाऱ्या १० मार्च रोजी च्या निर्धार मोर्चाला मोठ्या संख्येने गिरणी कामगार व वारसांनी उपस्थित राहणार असल्याची ग्वाही दिली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here