*कोनशी शाळेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ दिमाखात साजरा”*

दोडामार्ग (कोनशी) दि.०२: मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यी व समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे, मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन व विकास व्हावा हेतूने कोनशी शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनचरित्र व त्यांची वाङ्मय आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली. मुख्याध्यापक श्री सुरेश जाधव, डॉ. राजेंद्र चव्हाण, श्री बाबुराव पास्ते आणि श्रीम स्वाती देसाई यांनी कवी कुमाग्रजांच्या जीवनकार्य व साहित्याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यानी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितांचे वाचन करण्यात आले. वेदांत बर्वे याने सूत्र संचालन केले तर यश सावंत याने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here