कोलकाता दि.०५: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सध्या न्यूझीलंडच्या फिन ॲलन नावाचं वादळ घोंघावत आहे. कोलकाता येथे झालेल्या सेमीफायनल सामन्यात ॲलनने अशा काही फटकेबाजी केली की, क्रिकेट विश्वातील अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले. अवघ्या ३३ चेंडूत शतक ठोकत त्याने टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली आहे.
केवळ १२.५ ओव्हर्समध्ये विजय!
न्यूझीलंडसमोर १७० धावांचे आव्हानात्मक टार्गेट होते. मात्र, फिन ॲलनच्या स्फोटक खेळीसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाज हतबल दिसले. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ८ षटकार लगावले. त्याच्या या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ १२.५ ओव्हर्समध्येच पूर्ण करून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
हेटमायरचा विक्रम मोडला
या खेळीदरम्यान ॲलनने एका वर्ल्ड कप एडिशनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवला.
फिन ॲलन: २० षटकार (२०२६ एडिशन)शिमरोन हेटमायर: १९ षटकार (२०२६ एडिशन)साहिबजादा फरहान: १८ षटकार (२०२६ एडिशन)
एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीतही तो आता ख्रिस गेल (११ सिक्स) आणि एरॉन जोन्स (१० सिक्स) यांच्यानंतर संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
गोल्डन बॅटच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर फिन ॲलन सध्या या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ७ डावात ५७.८० च्या सरासरीने २८९ धावा कुटल्या आहेत. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ३८३ धावांसह सध्या अव्वल स्थानी आहे, पण फिन ॲलनचा एक सामना (फायनल) अद्याप बाकी असल्याने तो ही कसर भरून काढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
[05/03, 16:37] HP: 🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


