सावंतवाडी दि.०६: शहरातील प्रसिद्ध व्यापारी साईनाथ राजाराम मुंज (वय ६७) यांचे आज शनिवारी गोवा–बांबोळी येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने सावंतवाडी व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू स्वभाव, साधेपणा आणि लोकांशी जिव्हाळ्याने वागणारे साईनाथ मुंज यांच्या जाण्याने सावंतवाडीने एक आपुलकीचा माणूस गमावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील चेतन कम्युनिकेशनचे संचालक श्रेयस मुंज यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, व्यापारी वर्ग व परिचितांकडून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563